Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या संविधानामध्ये भारताचा एक दृष्टिकोन आहे. हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्या- मरण्याचा मार्ग आहे. देशात जगताना एकमेकांचा आदर करू, यात असे कुठे म्हटले नाही की एक व्यक्ती, एक संस्था ही संपूर्ण हिंदुस्थानची संपत्ती आहे. प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक जातीचा, धर्माचा, प्रत्येकाच्या मतांचा आदर केला पाहिजे. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS), भाजपचे लोक संविधानावर हल्ला करतात तेव्हा ते केवळ या पुस्तकावर हल्ला नाही तर या देशातील महापुरुषांच्या विचारधारेवर, जनतेच्या आवाजावर हल्ला करतात.
संविधानाने या देशातील संस्था तयार होतात. संविधान नसतं तर निवडणूक आयोग देखील नसतं. राजा महाराजांजवळ इलेक्शन कमिशन नव्हतं. त्यामुळे या संविधानमुळे शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र इत्यादी संस्था मिळातात. मात्र आरएसएस (RRS) यावर थेट हल्ला करत नाही, ते भितात. कारण समोरून लढायला तयार झाले तर ते पाच मिनिटात हरतील, हे त्यांना ठाऊक आहे. म्हणून ते समोरून येतं नाही. किंबहुना ते लपून वार करतात अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
जातीय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे- राहुल गांधी
देशाच्या प्रत्येक राज्यात असे काही नावं मिळतातकी त्यांची आपण आठवण करतो. त्यातून प्रेरणा मिळते. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशा घोषणा आपण देतो, त्यांच्या चर्चा आपण करतो, त्यावेळी त्या केवळ एका व्यक्तीबद्दल नाही तर कोट्यावधी लोकांचा आवाज असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते तेव्हा दुसऱ्यांचे दुःख त्यांच्या तोंडातून निघत होते. मी महामानव आंबेडकर यांची अनेक पुस्तक वाचली आहे. मला काय हवं आणि जनतेला काय हवं यातून ते जनतेचा विचार करत होते. देशात करोडो दलित आहे. त्यांचे दुःख, त्यांचा आवाज या संविधानात यायला हवा. या संविधानात फुले-शाहू-आंबेडकर-गांधी यांचा आवाज आहे. आपण आज संरक्षण करतोय ते हजारो वर्ष जुनं पुस्तक आहे. जातीय जनगणना याची हाक मी दिलीय. जातीय जनगणनेचा खरा अर्थ न्याय आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
जातीय जनगणना म्हटलं तर मोदीजी यांची झोप उडाली - राहुल गांधी
देशात 90 टक्के लोकांजवळ काही ताकद नाही. याचा काय अर्थ? बिना शक्ती, संपत्ती सन्मानाचा काय फायदा? मी म्हटलं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख करा, त्यात ओबीसी, दलित नावं नव्हते. न्यायव्यवस्था बघितली तर तेथे मोठे अधिकारी बघा. यात 90 टक्के भारत आपल्याला दिसतंच नाही. अदानी यांच्या कंपनीत मोठ्या पदांवर एक दलित नाही, आदिवासी नाही. पाच टक्के लोक देशाला चालवत आहे. 16 लाख कोटी रुपये त्यांचे माफ होतात. कर्नाटकात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. माझ्यावर टीका केली. मात्र आदानी यांनी पैसे दिले नाही तर त्याला देशभक्त मानतात. शेतकऱ्यांनी कर्ज दिलं नाही तर त्याला डिफॅाल्टर मानतात. जातीय जनगणना म्हटलं तर मोदीजी यांची झोप उडाली आहे. मोदीजी यांचा चेहरा बदलला. मी एम्लीफायर आहे लोकांना सांगनं माझं काम आहे, तर लोकांचा आवाज ऐकणं काम आहे. काहीही करा जातीय जनगणना होणार आणि आरक्षणाची 50 टक्के मर्यादा तोडणार. असेही राहुल गांधी म्हणाले.
हे ही वाच