Punjab Assembly Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी येणार आहेत. निवडणुकीच्या निकालापूर्वी आज पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली आहे. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.


'निकाल आल्यानंतर सविस्तर चर्चा होईल' 


कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या या भेटीबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, 'अमित शाह यांच्याशी झालेली चर्चा सामान्य विषयांवर झाली. निकाल आल्यानंतर सविस्तर चर्चा होईल.' त्यांनी सांगितले की, 'अमित शाहांसोबत पंजाब विधानसभेवर आमची चर्चा झाली आहे, या बैठकीचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. माझ्या पक्षाने निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. भाजपनेही चांगली कामगिरी केली आहे. पाहूयात पुढे काय होते.'


पंजाबमध्ये 117 जागांसाठी निवडणूक


पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणूक झाली. पंजाबमध्ये काँग्रेस आपली सत्ता वाचवण्यासाठी लढत आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 117 पैकी 77 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी अकाली दल - भाजप युतीला केवळ 18 जागा जिंकता आल्या होत्या. आम आदमी पक्षाला केवळ 20 जागा मिळाल्या. यावेळी काँग्रेससमोर आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल आणि बसपा आणि अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेस आणि भाजपच्या युतीचे मोठे आव्हान आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha