पुणे : समाजातील तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिवसेंदिवस सकारात्मक होताना दिसत आहे. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात राजकीय पक्षांनीही तृतीयपंथीयांसाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे.
नुकतंच निवडणूक आयोगाने एका तृतीयपंथी व्यक्तीला लोकसभा निवडणुकीसाठी ब्रँड अँबेसिडर केलं आहे. पुणे शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी दोघा तृतीयपंथीयांना आपल्या पक्षाचं सदस्यत्व दिलं आहे. फक्त सदस्यत्वच नाही तर पक्षातील एक पद त्यांच्याकडे सोपवून अनेक तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं महत्त्वपूर्ण कामही केलं आहे.
पुण्यातील तृतीयपंथी सोनाली दळवी यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्यावर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही तृतीयपंथी चांदणी गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं पुणे शहर महिला उपाध्यक्षपद दिलं आहे.
राजकीय पक्षात स्थान मिळाल्यामुळे आता समाजातील इतर तृतीयपंथीयांच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला हक्काचं व्यासपीठ मिळालं असल्याची भावना सोनाली दळवी यांनी व्यक्त केली. तर चांदणी गोरे यांनी वेळ पडलीच तर निवडणुकीलाही सामोरी जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न, पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महत्त्वाची पदं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Mar 2019 10:52 PM (IST)
पुणे शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी दोघा तृतीयपंथीयांना आपल्या पक्षाचं सदस्यत्व दिलं आहे. फक्त सदस्यत्वच नाही तर पक्षातील एक पद त्यांच्याकडे सोपवून अनेक तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं महत्त्वपूर्ण कामही केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -