PMC Election 2022 Prabhag 29  Khadakmal Aali – Mahatma Phule Mandai, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 29, खडकमाळ आळी - महात्मा फुले मंडई: पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 29 अर्थात खडकमाळ आळी - महात्मा फुले मंडई. नव्या प्रभागरचनेनुसार खडकमाळ आळी, महात्मा फुले मंडई, संत मदर तेरेसा चर्च, मामलेदार कचेरी, राजा दिनकर केळकर संग्रहालय, घोरपडे उद्यान, स्वारगेट पोलीस कॉलनी, शुभाषनगर, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे.  खडकमाळ आळी - महात्मा फुले मंडई या प्रभागातील 'अ' भाग हा सर्वसाधारण आरक्षित करण्यात आला आहे. 

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :
अ. सरस्वती किशोर शेंडगे (भाजप)
ब. महेश नामदेव लडकत (भाजप)
क.  स्मिता पद्माकर वस्ते (भाजप)
ड. धीरज रामचंद्र घाटे (भाजप)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
खडकमाळ आळी, महात्मा फुले मंडई, संत मदर तेरेसा चर्च, मामलेदार कचेरी, राजा दिनकर केळकर संग्रहालय, घोरपडे उद्यान, स्वारगेट पोलीस कॉलनी, शुभाषनगर, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ या प्रमुख भागांचा समावेश आहे. 


प्रभाग क्रमांक 29 : तीन सदस्य
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 29 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  29

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर