Pune Gram Panchayat Election Result 2022 LIVE : दौंड, इंदापूर आणि बारामती मतदान मोजणी पूर्ण

Pune Gram Panchayat Election Result 2022 LIVE : पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायतींच्या (gram Panchayat Election Results 2022) सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे .

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 20 Dec 2022 04:39 PM
अजित पवारांंनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला

पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्ये लढत होती. यात अजित दादांनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, माजी राज्यमंत्री दत्ता भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके यांच्या तालुक्यांचा ही मोठा वाटा राहिलेला आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला असताना ही भाजपला अवघ्या 38 ठिकाणी विजय मिळवता आला आहे. त्यामुळे हा भाजपला धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडाचं शस्त्र उगरल्यानंतर ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत, शिंदे गटाला मात्र तीन ग्रामपंचायतीत विजय मिळवून समाधान मानावे लागलेलं आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भोर आणि वेल्हा तालुक्यात अपेक्षेनुसार गड राखलेला आहे.

इंदापूर तालुक्याती भाजपला 11 राष्ट्रवादीला 8 तर स्थानिक आघाडीला 7 जागेवर विजय

इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचा मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपला 11 जागा राष्ट्रवादीला 8 जागा तर स्थानिक आघाडीला 7 जागा मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत झाली यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भरणेवर आघाडी मिळवलेली आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी स्थानिक आघाडी झाली. त्यामुळे सरपंच स्थानिक आघाडीचा झाला असला तरी आतली सदस्य संख्या ही वेगवेगळ्या पक्षात विभागली गेली आहे. बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. यामध्ये तेरा ठिकाणी राष्ट्रवादीने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. तर दुसरीकडे दौंड तालुक्यातील 8 ग्रामंचायत मध्ये मतमोजणी पार पडली. त्यामध्ये भाजपला 6 जागा तर राष्ट्रवादीला 1 आणि काँग्रेसला एक जागा मिळाली. त्यामुळे राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांना पराभूत केलं.

हवेली तालुक्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी तर भाजपला 3 ठिकाणी विजय तर 3 जागा शिवसेना ठाकरे गटाकडे

Pune Gram Panchayat Election Result 2022 live :हवेली तालुक्यातील 7व्या आणि शेवटच्या गावाचा निकाल जाहीर झाला आहे. गोगलवाडीच्या सरपंच पदी अश्विनी गोगावले विराजमान होणार आहे. अश्विनी गोगावले या अशोक गोगावले  यांच्या पत्नी असून त्या काळूबाई माता ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आहेत. हवेली तालुक्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी तर भाजपला 3 ठिकाणी विजय तर 3 जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्या आहेत.

दौंड तालुक्यात भाजपचं वर्चस्व

दौंड तालुक्यातील सहा जागा या भाजपला, एक राष्ट्रवादीला तर स्थानिक आघाडीला एक जागा मिळालेली आहे.

शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी

Pune Gram Panchayat Election Result 2022 live :शिरूर तालुक्यात एकूण ४ ग्रामपंचायतचे निकाल हाती लागले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले असून शिंदे गटाला 1 ठिकाणी यश आले तर1 ठिकाणी स्थानिक गटाने विजय मिळवला आहे

चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमधे काटे की टक्कर

 Pune Gram Panchayat Election Result 2022 live :  पुणे जिल्ह्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन दादांमध्ये लढत होती. यात अजित दादांनी आत्तापर्यंत 152 पैकी 68 ग्रामपंचायती ताब्यात घेत, गड राखला आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी स्वतः प्रचार केला असताना ही त्यांना अवघ्या 19 ठिकाणी विजय मिळवता आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडाचं शस्त्र उगरल्यानंतर ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 8 ग्रामपंचायती काबीज केल्या, शिंदे गटाला मात्र एकाच ठिकाणी समाधान मानावे लागलेलं आहे. भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी भोर आणि वेल्हा तालुक्यात अपेक्षेनुसार गड राखलेला आहे. अद्याप आणखी निकाल येणं बाकी आहे

Pune Gram Panchayat Election Result 2022 live : पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं पारडं जड

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं पारडं जड, जिल्ह्यात 221 पैकी आतापर्यंत 74 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर.

Pune Gram Panchayat Election Result 2022 live : हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली

Pune Gram Panchayat Election Result 2022 live :   हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस ग्रामस्थांनी मतमोजणी प्रक्रिया थांबवली आहे. ईव्हीएम वर 411 मतदान झाला असताना 408 मतदान दाखवत आहे. मतमोजणी थांबवण्यासाठी पिंपरी सांडस ग्रामस्थांचा आक्षेप आहे. 

मावळ तालुक्यात चंद्रकांत पाटलांना धक्का

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी मावळ तालुक्यात प्रचार केलेल्या निगडे गावात भाजपचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भिकाजी भागवत यांचा विजय झाला आहे. आत्तापर्यंत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी 4 तर भाजप 1 ठिकाणी विजयी झाले आहेत. 

Pune Gram Panchayat Election Result 2022 live : वेल्हे तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांचा दबदबा

 Pune Gram Panchayat Election Result 2022 live : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात काँग्रेसची आगेकूच सुरु आहे, सहा ठिकाणी काँग्रेसची सत्ता आली आहे. आमदार संग्राम थोपटे यांचा दबदबा बघायला मिळत आहे.

Pune Gram Panchayat Election Result 2022 live : आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा पक्ष निहाय जाहीर

 Pune Gram Panchayat Election Result 2022 live : आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा पक्ष निहाय जाहीर झाला आहे. 


घोडेगाव -एनसीपी
साल - उध्दव गट शिवसेना
आंबेदरा - एनसीपी
आमोंडी - एनसीपी
गंगापुर खुर्द - एनसीपी
चिंचोडी - शिवसेना शिंदे गट
चांडोली - एनसीपी
कळंब - एनसीपी
पारगांव तर्फे खेड - एनसीपी 
मेंगडेवाडी - एनसीपी
धामणी - एनसीपी 
भावडी - एनसीपी 
नारोडी - एनसीपी 
गोहे खुर्द - एनसीपी
निघोटवाडी - एनसीपी
रांजणी - एनसीपी


बिनविरोध 
नागापुर - एनसीपी
डिंभे खुर्द - एनसीपी
आहुपे - एनसीपी
तळेघर - एनसीपी
चिखली - एनसीपी

Pune Gram Panchayat Election Result 2022 live: मावळ तालुक्यात राष्ट्रवादी 3 आणि भाजप 1 सरपंच विजयी

Pune Gram Panchayat Election Result 2022 live : पुण्याच्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आगेकूच सुरू आहे. आत्तापर्यंत राष्ट्रवादी 3 आणि भाजप 1 ठिकाणी सरपंच विजयी झाले आहे. आमदार सुनील शेळके यांचा भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना धक्का मानला जात आहे

Pune Gram Panchayat Election Result 2022 live : मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक सरपंच


Pune Gram Panchayat Election Result 2022 live :पुण्याच्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक सरपंच विजयी झाला आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी 2 आणि भाजप 1 ठिकाणी विजयी झाले आहे

Pune Gram Panchayat Election Result 2022 live:बारामती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

Pune Gram Panchayat Election Result 2022 live: बारामती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. आहे. त्यामध्ये सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला आहे. 

Pune Gram Panchayat Election Result 2022 live: भोर मधील तीन ग्रामपंचायतील कॉंग्रेसचं वर्चस्व


Pune Gram Panchayat Election Result 2022 live: भोर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती  आला आहे. कर्नावाड, अंगसुळे, ब्राम्हणघर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विजयी झाला आहेत. ब्राह्मणघर ग्रामपंचायत रंजना धुमाळ , अंगसुळे ग्रामपंचायत राणी किरवे  तर कर्नावाड ग्रामपंचायत सोनाली राजीवडे विजयी झाले आहेत. 

Pune Gram Panchayat Election Result 2022 live: पुणे जिल्ह्यात मावळात भाजपने खातं उघडलं


Pune Gram Panchayat Election Result 2022 live: पुणे जिल्ह्यात भाजपने खातं उघडलं. मावळ तालुक्यात सरपंच पदी भाजप उमेदवार विजयी झाला आहे. 

Pune Gram Panchayat Election Result 2022 live: पुणे जिल्ह्यात मावळात भाजपने खातं उघडलं


Pune Gram Panchayat Election Result 2022 live: पुणे जिल्ह्यात भाजपने खातं उघडलं. मावळ तालुक्यात सरपंच पदी भाजप उमेदवार विजयी झाला आहे. 

Pune Gram Panchayat Election Result 2022 live: पुणे जिल्ह्यात मावळात भाजपने खातं उघडलं


Pune Gram Panchayat Election Result 2022 live: पुणे जिल्ह्यात भाजपने खातं उघडलं. मावळ तालुक्यात सरपंच पदी भाजप उमेदवार विजयी झाला आहे. 

Pune Gram Panchayat Election Result 2022 live: हवेली तालुक्यात 194 उमेदवार रिंगणात


Pune Gram Panchayat Election Result 2022Live: हवेली तालुक्यात एकुण 7 ग्रामपंचायती आहेत.आहेरीगाव,आव्हाळवाडी,कदमवाक वस्ती,बुर्केगाव,पिंपरी सांडस,पेरणी,गोगलवाडी या ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 194उमेदवार रिंगणात आहेत. 

Pune Gram Panchayat Election Result 2022: मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडलं; वंदना आंबेकर विजयी



Pune Gram Panchayat Election Result 2022: मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने खाते उघडले. देवले गावच्या सरपंच वंदना आंबेकर यांचा विजय झाला आहे. 

Pune Gram Panchayat Election Result 2022: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात

Pune Gram Panchayat Election Result 2022:  पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला  सुरुवात झाली आहे. हवेली तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे. 

पार्श्वभूमी

Pune Gram Panchayat Election Result 2022 :  पुणे जिल्ह्यातील 176 ग्रामपंचायतींच्या (gram Panchayat Election Results 2022) सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. त्यानंतर अर्ध्या तासांतच निवडणुकीचे निकाल लागतील. निकालामुळे मतमोजणी केद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 80.79 टक्के मतदान झालं होतं. त्यात अडीच लाखाहून अधिक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.