Pune By-Poll Results 2023 LIVE Updates: चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप 36 हजार मतांनी विजयी 

Pune By-Poll Results LIVE Updates: चिंचवड आणि कबसा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. पहिल्या दिवसापासून वादात राहिलेल्या पोटनिवडणुकीत मतदार राजानं कोणाला कौल दिलाय हे स्पष्ट होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Mar 2023 06:17 PM

पार्श्वभूमी

Pune By-Poll Results 2023 LIVE Updates: कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक पहिल्या दिवसापासून वादात आहे. या निवडणुकीच्या प्रचार सभेत कधी राडा झाला तर आज निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचा आरोप...More

Ashwini Jagtap: चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप 36 हजार मतांनी विजयी 

चिंचवड मतदारसंघात  भाजपचीच सरशी झाली आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप  यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 435 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली. अश्विनी जगताप या 36 हजार 168 मतांच्या फरकाने विजयी झाल्यात.