Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. सर्वच राजकीय नेत्यांच्या सभांचा घुरळा उडत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite patil) यांनी भाजप सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलीय. अशातच भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मदतीला खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील निंबाळकांसाठी माढा, सांगोला आणि अकलूजमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.  


माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची 


माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. माढ्यात भाजपकूडन पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना संधी गेण्यात आलीय. तर दुसरीकडं शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे आता निंबाळकरांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी माढ्यात सभा घेणार आहेत. तर रविवारी एकाच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा होणार आहेत. 


कोण कुठं घेणार सभा?


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माढा, सांगोला, अकलूज येथे सभा घेणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही 30 एप्रिल रोजी माढ्यात सभा घेणार आहेत. दरम्यान, 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात सभा घेणार आहेत. आमदार राम सातपुते यांच्यासाठी नरेंद्र मोदी तर आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी उद्धव ठाकरे सोलापुरात सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींची होम मैदानावर तर उद्धव ठाकरेंची कर्णिकनगर मैदानावर जाहीर सभा होणार आहे. त्यामुळं एकाच दिवशी होणाऱ्या या दोन जाहीर सभांकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.


दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सभा घेत आहेत. मोडनिंबमध्ये नुकतीच त्यांची सभा झालेली असताना, आता पुन्हा आज करमाळ्यात शरद पवारांची सभा होत आहे. त्यामुळं आता पवारांना टक्कर देण्यासाठी पंतप्रधानांसह देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


मोहिते पाटलांविरोधात फडणवीसांचं चक्रव्यूह, पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी सर्वपक्षीय मोहिते विरोधक भाजपसोबत