सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील प्रस्थापीत विरोधक आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडल आहे. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचं बुजगावणं असल्याची  टीका प्रकाश आंबेडकरांनी केलीय. तसेच अकबरुद्दीन ओवैसी यांची भाषा ही दलित चळवळीतील साहित्यिक राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यासारखीच असल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

नामदेव ढसाळ राजा ढाले आणि ओवेसी यांची भाषा एकाच आहे. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी इथले पोलीस काढून घ्या असे म्हटले होतेच पण त्यावेळी त्यांच्या या भाषेला मी विरोध केला होता. स्टेटला कोणीच चॅलेंज करू शकत नाही. अकबरउद्दीन ओवैसीची जी भाषा आहे तीच भाषा आरएसएसचे आहे. त्याबद्दल मात्र कोणीच काही बोलत नसल्याचंही आंबेडकर म्हणाले.

वंचित आघाडी बहुतांश सर्व जागांची यादी जाहीर केली करेल. आत्ताची परिस्थिती एकंदरीत चांगली आहे. आम्हाला असं दिसतंय की 50 टक्के मतदान हे आमच्याकडे फिरेल. उमेदवारांचा एक राउंड झाला आहे. आम्हाला आलेले रिपोर्ट उत्साही असल्याचे आंबेडकर म्हणाले.

माढामधील जे काही सर्वेक्षण झालं आहे त्यात वंचित आघाडी 50 तर राष्ट्रवादी 30 टक्के आणि भाजप 20 टक्के दाखविण्यात आलं आहे. अजूनही सेना भाजपा उमेदवार जाहीर केलेला नाही. तरुणांत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. केजी टू पीजी शिक्षणाची जबाबदारी सरकारची असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अभ्यासक्रम सार्वत्रिक असला पाहिजे हा मुद्दा देखील आमच्या जाहीरनाम्यात असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

EXCLUSIVE | प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त आणि खळबळजनक मुलाखत | सोलापूर | एबीपी माझा



बेरोजगारी ही आत्ताची मोठी समस्या आहे. मनूच्या व्यवस्थेत काहींना प्रॉपर्टी अधिकार होता तर काहींना नव्हता. सर्व महामंडळां अंतर्गत येणाऱ्या सर्व वर्गाला बिनातारण पाच कोटीपर्यंतचं कर्ज देण्याचं आश्वास आंबेडकरांनी दिलं आहे. अट एकच पाच टक्के त्याचा वाटा असायला हवा. यात सगळे कलाकार आणि कारागीर येतात. आजवर त्यांची कला कर्तबगारी येथील धनदांडग्यानी हिसकावून घेतली आहे. मार्केट पूर्णतः कोसळले आहे. मोदी सरकार असेपर्यंत मार्केट सुरळीत होण्याची शक्यताही कमी असल्याचंही आंबेडकर म्हणाले.

व्यापारी वर्ग सध्या रामाच्या नावाने भाजपाकडे आहे. आजकाल व्यापाऱ्यांच्या आत्महत्या व्हायला सुरुवात झाली आहे. भविष्यात व्यापाऱ्यांचे हाल शेतकऱ्यांसारखे व्हायचे नसतील तर वंचित आघाडीशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत तर ते प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांचे ते प्रतिनिधित्व करीत असल्याची टीका आंबेडकरांनी केली.

वय झालं की बुद्धी भ्रष्ट होते, विसरभोळे पणा वाढतो. माढा सेफ वाटत असेल तर अकोल्याला या मी जिंकून देतो असा टोला आंबेडकरांनी पवारांना लगावला. तर आम्ही बी टीम वाटतो तर माढ्यात आमची एवढी धास्ती का घेतायत असा सवालही केला. नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावं की ते शरद पवार यांच्याकडे वारंवार का जातात. हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येतीलच असा. अजून एक महिना बाकी आहे. मोदींनी आमच्या घरी चहा प्यायला येण्याचं आवानही केलं. गेल्या पाच वर्षात पाच वेळा पवारांच्या भेटीला मोदी का गेले याचं उत्तर नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला द्यायला हवं असंही आंबेडकर म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी आमची लढत नाहीच आहे, आम्ही तर सेना भाजपाच्या विरोधात लढत असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केले.