Sanjay Raut on Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे देखील दिसून येत आहे. आज त्यांचा एक फोटो पक्षाकडून 'एक्स'वर पोस्ट करत, ते आता ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर फेसबुकवरती प्रकाश आंबेडकरांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, त्यामध्ये त्यांनी, विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. या दोन्हीच्या अनुषंगाने इलेक्शन महत्त्वाचे आहे. विधानसभेमध्ये आमदार निवडून आले तर त्या ठिकाणी आरक्षणावरचा हल्ला थांबवता येईल म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना आरक्षणवादी जनतेला आव्हान करतोय की, वंचित बहुजन आघाडी म्हणजेच गॅस सिलेंडरच्या पाठीमागे उभे रहा असं आवाहन रूग्णालयातून मतदारांना केलं आहे. त्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. 


माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, "सगळ्यात आधी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांची प्रकृती आराम पडावा त्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे, काळजी आहे.ते या राज्याची नेते आहेत. त्यांचे वक्तव्य मला कोणीतरी सांगितलं, पण ते सत्त्यावर आधारित नाही. कोणत्या प्रकारचा आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य ICU मधून करू नये. त्यांनी आधी स्वतःची प्रकृती सांभाळावी, ते ICU मध्ये आहेत, छातीवर ताण येईल अशी वक्तव्य त्यांनी ICU मधून  करू नये. ही खूप नाजूक शस्त्रक्रिया असते मी त्यातून दोन-तीन वेळा गेलोलो आहे. त्यांनी जास्त बोलू नये. पुढचे सात आठ दिवस त्यांनी खूप कमी बोललो पाहिजे असा वैद्यकीय सल्ला असतो. या प्रकरणांमध्ये त्यांनी आधी आपली प्रगती सांभाळावी महाराष्ट्र आम्ही सांभाळतो',अशा शब्दात त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर हल्लाबोल केला आहे.



काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर? 


फेसबुकवरती प्रकाश आंबेडकरांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, त्यामध्ये ते म्हणतात, ''मी सध्या आयसीयूमध्ये आहे. माझ्यावर अँजिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी झालेली आहे. डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे, निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. या दोन्हीच्या अनुषंगाने इलेक्शन महत्त्वाचे आहे. विधानसभेमध्ये आमदार निवडून आले तर त्या ठिकाणी आरक्षणावरचा हल्ला थांबवता येईल म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना आरक्षणवादी जनतेला आव्हान करतोय की, वंचित बहुजन आघाडी म्हणजेच गॅस सिलेंडरच्या पाठीमागे उभे रहा आणि गॅस सिलेंडर चिन्हावरती आपला मूल्य मध्याल अशी अपेक्षा करतो".



ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दुसऱ्या बाजूस एससी, एसटी, ओबीसी आरक्षण वाचविण्याची ही अस्तित्वाची लढाई आहे. एससी, एसटी आरक्षणाच्या क्रिमीलेयरची अंमलबजावणी होणार आहे. या निवडणुकीत आपली सगळ्यांची जबाबदारी महत्वाची आहे. विधानसभेत आमदार निवडून आले, तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येतो. आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरमागे उभे रहा, असे आवाहनही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि आरक्षणवादी जनतेला केले आहे.


प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीत सुधारणा


वंचितच्या सोशल मिडियावर आंबेडकरांचा पहिला फोटो समोर आला आहे. कोरा चहा (ब्लॅक टी), मारी बिस्किटे आणि वर्तमानपत्रे वाचून बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकरांनी आपल्या दिवसाची सुरुवात अशी केली आहे. बाळासाहेबांना आज रुग्णालयातील आयसीयूमधून दुसऱ्या विभागात हलवण्यात येत आहे. आम्ही लवकरच बाळासाहेबांचा एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करणार आहोत, असे एक्सवरील (पुर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये सांगण्यात आली आहे.