धुळे : भाजपच्या अंतर्गत वादामुळे राज्यभर चर्चेत असलेली धुळे महानगरपालिकेची निवडणूक उद्या होणार आहे. या निवडणुकीसाठी 450 बूथवर मतदान होणार आहे. त्यातील 120 मतदान केंद्र संवेदनशील तर 19 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त असणार आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यासोबतच ड्रोन कॅमेराने देखील मतदान केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी एक पोलीस अधीक्षक, एक एडिशनल एसपी, 4 डीवायएसपी, शंभर अधिकारी आणि दीड हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे.


धुळे महानगरपालिकेत 74 जागा आहेत. यापैकी 73 जागांसाठी उद्या मतदान होईल. यातील एक जागा बिनविरोध आली आहे. प्रभाग 12 मधीप अ मध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.


सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान प्रकिया पार पडेल. 3 लाख 29  हजार  569 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 74 हजार 696 तर महिला मतदार 1 लाख 54 हजार 807 असतील तर (तृतीयपंथी) इतर मतदार 13 आहेत..


प्रत्येक मतदान केंद्रावर 6 कर्मचारी असतील. तर 450 ईव्हीएम मशीनवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. 10 टक्के ईव्हीएम मशीन एखाद्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास राखीव असतील. गत महापालिका निवडणुकीत 62 टक्के मतदान झाले होते. यावर्षी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनीच भाजपच्या विरोधात शड्डू ठोकल्याने लढत अधिक चुरशीची झाली आहे.


सबंधित बातम्या