टीझरच्या सुरुवातीलाच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटना दिसते. राहुल गांधींच्या बालपणापासून सुरु होणाऱ्या या चित्रपटात त्यांच्या वयाचे विविध टप्पे दिसणार आहेत. वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी, बहीण प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह अशा विविध व्यक्तिरेखा त्यानंतर पडद्यावर दिसतात. लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर टीझरचा अखेर होतो.
रुपेश पॉल यांनी या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता अश्विनी कुमार या चित्रपटात राहुल गांधींच्या भूमिकेत दिसत आहे. 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात मनमोहन सिंहांची भूमिका साकारणारे अनुपम खेर या सिनेमातही तीच भूमिका साकारणार आहेत. तर हिंमत कपाडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा सादर करत आहेत.
नुकतंच मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यासारख्या राजकारणातील दिग्गजांवर चरित्रपट येऊन गेले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'नमो वर्सेस रागा' ही टक्कर बॉक्स ऑफिसवरपण रंगणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
पाहा टीझर :