Uttarakhand Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. उत्तराखंडमधील अल्मोडा येथे पंतप्रधान मोदींची आज जाहीर सभा झाली. यावेळी ते म्हणाले की, मतदार चांगले काम कधीही विसरत नाहीत आणि चांगला हेतू असणारांची साथही सोडत नाहीत. ही निवडणूक भाजपपेक्षा जनतेनी हातात घेतली आहे. ही निवडणूक जनताच लढवत असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच सबमें डालो फूट, मिलकर करो लूट अशी काँग्रेसची निती असल्याचे देखील मोदी यावेळी म्हमाले. 


पंतप्रधानांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार निशाणा लगावला. आमचे सरकार 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या संकल्पने काम करत आहे. पण आमचा विरोध करणाऱ्यांचे सूत्र आहे  'सब में, विभाजन, संयुक्त रूप से लूट'! हेच काँग्रेसचे धोरण देशभर असल्याचे मोदी यावेळी म्हणले. तसेच सबमें डालो फूट, मिलकर करो लूट अशीच काँग्रेसची निती असल्याचा टोला देखील मोदींनी लगावला.


पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील मुद्दे


आता उत्तराखंड विकासाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे उत्तराखंडला नवी ओळख मिळत आहे. भाजपने जारी केलेला जाहीरनामाही विकासाच्या नवीन ऊर्जेने भरलेला असल्याचे मोदी म्हणाले. उत्तराखंड आमच्यासाठी देवभूमी आहे. आमच्या डबल इंजीन सरकारने उत्तराखंडमध्ये विकास केला आहे. लसीकरणाबद्दल हे लोक काय बोलत होते. ते म्हणायचे की, डोंगराळ भागातील  प्रत्येक गावात लस पोहोचू शकत नाही. पण उत्तराखंडचे सरकार जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. काँग्रेसच्या लोकांचा लोकांचा उत्तराखंडवर अविश्वास असल्याचे मोदी म्हणाले. हेच लोक म्हणायचे की डोंगरावर रस्ते बांधणे सोपे नाही. मात्र, आज उत्तराखंडमधील चार धाम जोडण्यासाठी 'ऑल वेदर' रस्त्याचे काम सुरू आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: