पुणे: राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. काही दिवसांवर निवडणुका आल्या आहेत. पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच आता प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर होईल. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचा जाहीर सभांचा धडाका असण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या सभांचा धडाका लावला होता, त्याचप्रमाणे मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात येण्याची शक्यता आहे. 


विधानसभा निवडणुकांसाठी खूप कमी दिवस राहिले असल्याने जास्त सभा घेणे शक्य नसल्याची चर्चा आहे. मात्र प्रत्येक विभागात एक तरी सभा पंतप्रधान मोदी यांची घेण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी आणि उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच सभाचा धडाका लावण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर पंतप्रधान मोदी यांच्या जाहिर सभा होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी मोदी जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबचे वेळापत्रत येण्याची शक्यता आहे. 


राज्यात निवडणुका कधी?


केंद्रीय निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबरला राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा अस्तित्त्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील 288 जागांवर एकाच दिवशी मतदान पार पडेल. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्व राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.


उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काही पात्रतेच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.   


निवडणूक कार्यक्रम :


निवडणुकीचं नोटिफिकेशन:  22 ऑक्टोबर 2024


अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 


अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024


अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 


मतदान  :20 नोव्हेंबर 2024


मतमोजणी :  23 नोव्हेंबर  2024


निवडणूक प्रक्रिया समाप्त:  25 नोव्हेंबर  2024


विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. तरी अद्याप राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या जागावाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. मविआ आणि महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा येत्या एक दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.