नवी दिल्ली : 'में भी चौकीदार' या मोहीमेला सुरुवात केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज या मोहीमेला पाठिंबा देणाऱ्या लोकांशी संवाद साधला. देशातील अनेक ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडल्या गेलेल्या अनेकांच्या प्रश्नांना मोदींनी उत्तरंही दिली.


यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी एखादा निर्णय घेताना आपण नुकसान किंवा फायद्याचा विचार करत नाही असं सांगितलं.  नफा-तोटा याचा विचार करुन देश चालवायचा असता तर या देशात मोदी पंतप्रधान बनायची गरज नव्हती, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे :

  • मी कधीही जनतेच्या पैशावर 'हात' पडू देणार नाही

  • देशातील प्रत्येक व्यक्ती चौकीदार आहे, समाजासाठी काम करणारा प्रत्येक जण चौकीदार आहे

  • काही लोकांचा बौद्धिक विकास झालेला नाही

  • देशातील जनता चौकीदाराच्या पाठीशी आहे

  • बालाकोट मी नाही देशाच्या सैनिकांनी केलं आहे. आपल्या सैन्यानं केलं आहे

  • 2014 च्या निवडणुकीवेळी देखील काही लोक पंतप्रधानाच्या रांगेत उभे होते. यावेळी ती रांग थोडी मोठी आहे.

  • एखादा निर्णय घेताना नफा-तोटा याचा विचार करुन देश चालवायचा असता तर या देशात मोदी पंतप्रधान बनायची गरज नव्हती

  • संपुर्ण बहुमत असलेलं सरकार देशासाठी खुप मोठी ताकद असते. जगात भारताचा आवाज ऐकला जातो त्याला मोदींपेक्षा हे संपुर्ण बहुमाताचं सरकार जास्त कारणीभूत आहे.

  • मला आपल्या सैन्याच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना सुट देऊ शकलो.

  • दहशतवादाचा त्रास 40 वर्षांपासून आहे.  दहशतवाद्यांना कोण पोसतं ? त्यांचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? हे सगळ्यांना माहिती आहे.


 

व्हिडीओ :