Pimpri Chinchwad Municipal Election 2026 : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला चिन्ह वाटपात मात्र राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह देण्यात आलं. हे कसं काय घडलं? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर ते घडलं असं की अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे (Jayshree Bhondve) या अधिकृत उमेदवार होत्या. मात्र त्यांचा एबी फॉर्म गहाळ झाला, त्यामुळे छाननीमध्ये त्यांना अपक्ष उमेदवार ठरवण्यात आलं. मग त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सीसीटीव्ही, व्हिडिओग्राफी, तसेच इतर तांत्रिक पुरावे सादर केले. यात तथ्य असल्याचं पाहून न्यायालयाने निवडणूक आयोगाला हे पुरावे तपासण्यासाठी स्वतंत्र सुनावणीचे आदेश दिले.

Continues below advertisement

दरम्यान, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीचं तातडीनं सुनावणी घेतली, जयश्री भोंडवे यांनी वेळेतचं एबी फॉर्म सादर केला. हे त्यांच्या ही निदर्शनास आलं. हर्डीकरांनी जयश्री भोंडवेंचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. त्यामुळं अर्ज छाननीच्या अंतिम यादीत अपक्ष ठरलेल्या जयश्री भोंडवेंना चिन्ह वाटपाच्या यादीत घड्याळ चिन्ह दिल्याचं जाहीर करण्यात आलं.

Colaba : कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळ, मुंबई महापालिकेचा राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर

Continues below advertisement

कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर केला आहे. वॉर्ड ए निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांची कृती वेळेच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत, मात्र टोकन क्रमांक देऊनही अर्जदाराला अर्ज भरण्याची संधी न दिल्याने ही कृती प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य असल्याचं मुंबई महापालिकेने आपलं म्हणणं राज्य निवडणूक आयोगाकडे मांडलं आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? हे आता पहावं लागणार आहे.

Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी निवडणूक

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी निवडणूक होत आहे. एकूण 32 प्रभागांपैकी महापालिकेच्या 17 प्रभागांमध्ये माजी नगरसेवक आणि सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. त्यामुळे सामन्यांची रंगत वाढली आहे. त्या ठिकाणी काँटे की टक्कर होणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. सर्वच पक्षीयांनी 128 जागांवर उमेदवार दिले आहेत. 

Mumbai : आरोपातून जनता दलाचा यु टर्न, निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

दरम्यान, या सगळ्या संबंधीची तक्रार जनता दल आणि आप पक्षाकडून करण्यात आली होती. यामध्ये फक्त निवडणूक निर्णय अधिकारीच नाही तर विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या कृतीवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपातून जनता दलाचा यु टर्न पाहायला मिळाला असून राज्य निवडणूक आयुक्तांना जनता दलाने पत्र दिले आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये विधानसभा अध्यक्ष विरुद्ध तक्रार करण्यात आली होती आणि यामध्ये गैरसमज दूर झाल्याचे जनता दलाने आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यामुळे या सगळ्या तक्रारींचा विचार करत राज्य निवडणूक आयोग याप्रकरणी काय निर्णय घेतात? याकडे लक्ष असेल.