Horoscope Today 5 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 5 जानेवारी 2026, आजचा वार सोमवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज सोमवार दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज काही जगावेगळ्या भन्नाट कल्पना तुमच्या डोक्यात असतील त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न कराल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल तुमच्या ज्ञानाला धाडसाची जोड मिळेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कामाची गती वाढेल प्रत्येक गोष्ट सहजगत्या केल्यामुळे कामातही सहजता येईल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिला अंत स्फूर्तीने काम करतील आर्थिक चणचण थोडी भासेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि विचारसरणी असा सगळा स्वतंत्र खाक्या राहिल्यामुळे इतरांशी जमणे थोडे अवघड जाईल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज पैसा हातात पडल्यामुळे जुनी देणे देऊन टाकाल कुटुंबीयांसमवेत प्रवासाला जाण्याचे बेत आखाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज कुटुंबातील एखाद्या विक्षिप्त स्वभावाच्या माणसाचा थोडा त्रास होईल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जी गोष्ट करायला हवी ती न केल्यामुळे लाभ मिळण्यामध्ये कमतरता भासेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज राजकारणामध्ये असलेल्या लोकांनी आपले पाय रोवण्यासाठी डावपेच खेळायला हरकत नाही
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज महिला व्यवहारी बनतील आपला हेका न सोडल्यामुळे मात्र नुकसान होऊ शकते
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज थोडा सारासार विचार करावा लागेल विद्यार्थी वर्ग अभ्यासाबरोबरच इतर गोष्टींमध्ये रस घेतील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज एकाग्रता वाढवण्यासाठी थोडी ओंकार साधना उपयोगी पडेल घरामध्ये नवीन विचारांचे स्वागत करायला लागेल
हेही वाचा
Ashtadash Yog 2026: नववर्ष... मोठं यश...संपत्तीत वाढ...4 जानेवारीपासूनच 3 राशींच्या नशीबाचे फासे पालटले! मंगळ-यम ग्रहांचा पॉवरफुल अष्टदश योग
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)