पाटोदा तालुक्यातील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. विशेष म्हणजे पार्थ यांच्या भाषणावर टीका करताना पंकजा मुंडे यांनी चांगले भाषण करणाऱ्या धनंजय मुंडे यांना मात्र आपल्या पेक्षा लहान बहिणी वर टीका करताना काहीच वाटत नाही का असा सवाल विचारला आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे
मला लोकांनी विचारलं पार्थ पवार यांच्या भाषणावर तुमचं काय मत आहे? मी त्यांना म्हटलं नवीन नवीन भाषणात चुकतो तो माणूसच. काही लोक तर बिना भाषणाची पण नेतेगिरी करतात असं म्हणतं धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीका केली. मला वाटलं कदाचित तेही बिना भाषणाचे चांगले नेते असू शकतात. माझ्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या माणसावर मी टीका करणं बरोबर आहे का? आपल्या पाठीवर जन्म घेतलेल्या बहिणी वर टीका करणे बरोबर आहे का तुम्हीच सांगा असं म्हणत माझ्या स्वतःच्या पाठीवर जन्म घेतलेल्या माझ्या बहिणीला पात्रता विचारणाऱ्या भावाला आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून देण्याची क्षमता ही माझ्यामध्ये आणि धसांमध्ये असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
VIDEO | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं गाजलेलं भाषण | आष्टी, बीड | एबीपी माझा
पवार कुटुंबाकडून आमच्या भावाने काहीतरी शिकले पाहिजे
आमच्या बापाने संस्कार सगळ्यांवरच केले. भावाने आता दुसरे संस्कार स्वीकारले आहे. ज्या पवार कुटुंबीयांचे तुम्ही नेतृत्व स्वकारले त्या कुटुंबात सगळे एकच आहेत. बहिण भाऊ एकमेकांबरोबर फोटो काढतात. एकमेकांच्या ननंद भावजय कौतुक करतात. पण यातून आमच्या भावाने थोडेफार शिकले पाहिजे असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे. तुम्ही विचाराने गेलात तुम्ही विचाराने विरोध करा तुमच्या अचाराने विरोध करू नका अस ही या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.