पंढरपूर : निवडणुकांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी लोकप्रिय टीव्ही कलाकारांनी हजेरी लावणं नवीन नाही. सहसा गर्दी खेचणाऱ्या 'झी मराठी' वाहिनीवरील राणा दा-अंजलीबाईंकडे पंढरपूरवासियांनी मात्र पाठ फिरवली.


दुसऱ्या टप्प्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल (मंगळवारी) कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये रॅली काढण्यात आली होती.

या रॅलीला झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणा दा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अंजली पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर यांना बोलवण्यात आलं होतं. मात्र लोकांनी पाठ फिरवल्याने या रॅलीचा फज्जा उडाल्याची माहिती आहे.

VIDEO | जेव्हा छगन भुजबळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करतात... | हॅलो माईक टेस्टिंग



खरं तर पंढरपूरमध्ये चैत्री एकादशीसाठी हजारोंच्या संख्येने भाविक आले होते. मात्र टीव्ही स्टारकडे लोकांनी चक्क दुर्लक्ष केल्यामुळे मोजक्या कार्यकर्त्यांसह ही रॅली उरकती घ्यावी लागल्याचं वृत्त आहे.

ढॅण्टढॅण: 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये लाडूची एण्ट्री कशी झाली? लाडूचे भन्नाट किस्से



सोलापूरमध्ये महाआघाडीच्या सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर भाजपच्या जय सिद्धेश्वर स्वामींचं आव्हान आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक तिरंगी झाली आहे.