मालिकेची नायिका इशाला गंडवण्यासाठी 'खल'नायक विक्रांत सरंजामे डावपेच आखत आहे. मात्र मुख्य कथानकाच्या जोडीला शिजणारे 'राजकीय डावपेच' मालिकाकारांच्या अंगलट येऊ शकतात. 'तुला पाहते रे' मालिकेत विशिष्ट पक्षाचा प्रचार केल्याने निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या मालिकेविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाडे तक्रार केली होती.
VIDEO | टिकटॉक अ्ॅपची बोलती बंद होणार? | स्पेशल रिपोर्ट
काय होता आरोप?
तुला पाहते रे मालिकेचा नायिका इशा निमकर हिची मैत्रीण रुपाली आणि मित्र बिपीन यांच्यामध्ये सोमवारच्या भागात एक संवाद रंगला होता. यामध्ये बिपीन चक्क सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेचा आपल्याला लाभ झाल्याचं सांगत होता.
‘भाभीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राब्ता’च्या निर्मात्यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सक्त ताकीद
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काही हिंदी आणि मराठी मालिकांच्या माध्यमातून राजकीय पक्ष प्रचार करत असल्याची राळ उठली होती. तुला पाहते रे सोबतच भाभीजी घर पर है, तुझसे है राबता आणि कुंडली भाग्य यासारख्या मालिकांमधून केंद्राच्या योजनांवर स्तुतिसुमनं उधळण्यात आली होती. त्यानंतर संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.