पंढरपूर : शरद पवार चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करत आहेत. या चार जागा भाजपने जिंकल्यावर पवारांना दिल्लीत राहायला घर शोधावे लागेल, असा घणाघात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा शनिवारी घेण्यात आला होता. यासाठी चंद्रकांत पाटील यांचेसह सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.