पंढरपूर : भाजपशी संलग्न असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीने चर्चेला उधाण आलं आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी अजित पवारही उपस्थित होते.
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय शिंदे यांची भेट महत्त्वाची समजली जाते. संजय शिंदे हे पालकमंत्री गटाचे नेते असून सहकारमंत्र्यानी नुकतंच त्याना पवारांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडण्याचा इशारा दिला होता. यानंतरही संजय शिंदे यांची भेट घेतल्याने यास विशेष महत्त्व आलं आहे.
संजय शिंदे हे माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू असून, आज पिंपळनेर इथे होणाऱ्या शरद पवार यांच्या बैठकीत त्यांना स्टेजवर येण्याचा आग्रह होत आहे.
शरद पवार-संजय शिंदे भेटीने चर्चेला उधाण, भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Feb 2019 10:03 AM (IST)
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय शिंदे यांची भेट महत्त्वाची समजली जाते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -