उस्मानाबाद : मतदान करताना फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी प्रणव पाटीलने मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलं होतं.


सायबर क्राईम अंतर्गत चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत आदेश दिले आहेत.



मतदान गोपनीयता आणि सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणव पाटीलच्या फेसबुक अकाऊंटवरुनही फेसबुक लाईव्हचा व्हीडिओ काढून टाकण्यात आला आहे.

उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांविरोधात राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.