अहमदाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोरने काँग्रेसची साथ सोडली आहे. अल्पेश ठाकोर यांच्यासोबत धवलसिंह ठाकोर आणि आमदार भरतजी ठाकोर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. अल्पेश ठाकोर हे काँग्रेसच्याच तिकीटावर आमदार झाले होते. अल्पेश यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. त्यांनी काँग्रेसकडे साबरकांठा लोकसभा जागेची मागणी केली होती, पण त्याकडेही काँग्रेसने दुर्लक्ष केलं. त्यामुळे ते काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते. अखेर त्यांनी पक्षाचाच हात सोडला आहे.

11 एप्रिल म्हणजेच गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी अल्पेश ठाकोरने राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा झटका दिला.