Maharashtra Assembly Elections 2024 नागपूर : गेल्या दहा वर्षात नागपूरात एक लाख कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे झाले. यात चांगले रस्ते झाले, 70 टक्के नागपुरकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळते आहे. आम्ही मिहानमध्ये 78 हजार स्थानिक तरुणांना नोकरी दिली आहे. जे देशात, जगात कुठे नाही, असे अनेक प्रकल्प एकट्या नागपुरात बघायला आज मिळत आहे. गेल्या 60-70 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते महायुतीने दहा वर्षात केलं आहे. ही सर्व विकासकामे माझ्यामुळे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अथवा अन्य कोणामुळे नाही. तर तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे झाले आहे. आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तो अभी बाकी है! त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना,देवेंद्र फडणवीसांना संधी द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केलंय. ते नागपुरातील (Nagpur) भाजपच्या शक्तिप्रदर्शन रॅलीत बोलत होते.
दुसऱ्या पक्षातील नेत्यांना केवळ आपल्या मुलाबाळांच्या उमेदवारीची चिंता
दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या मुलाबाळांना उमेदवारी देण्याची चिंता आहे. मात्र आम्हाला नागपूर आणि राज्याच्या विकासाची, गोरगरीबांच्या मुलांची काळजी आहे. तरुणांना आम्ही नोकरी मिळवून देत आहोत. प्रगतीच्या दिशेने देशाला पुढे नेत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्या, देवेंद्र फडणवीस बावनकुळे सारखे लोक सत्तेत गेले, तर ते पुन्हा चांगले काम करून दाखवतील, असा विश्वासही नितीन गडकरींनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय.
नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आहेत. त्यानंतर ते तहसील कार्यालयात जात आपला अर्ज सादर करणार आहेत. याबबात बोलताना हा विजयाचा शंखनाद असेल अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे.
आपल्यापेक्षा आपले काम बोलतं आहे -देवेंद्र फडणवीस
आपल्यापेक्षा आपले काम बोलत आहे. म्हणून आज जास्त बोलायची गरज नाही. गडकरींच्या नेतृत्वात आपण नागपुरात केलेला बदल लोक आज डोळ्यांनी पाहत आहेत. गेल्या दहा वर्षात आम्हाला साडेसात वर्षे मिळाले, आमच्या साडेसात वर्षाचा काळ आणि त्यापूर्वीचा पंधरा वर्षाचा काळ (महाआघाडीचा सरकार) तुलना करा. तुमच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होते आले. मोदींनी नवीन भारताची निर्मिती सुरू केली आहे आणि त्यांचे नेतृत्वात आम्ही नवीन महाराष्ट्राची निर्मिती सुरू केली आहे. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हे ही वाचा