सोशल मिडीयावर आमदार नितेश राणे यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत नितेश राणे संघ शाखेत शिस्तपालन करत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवर टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी संघाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने अनेकांनी त्यावर टीका केली होती. त्याबाबत बोलताना राणे यांनी आपण आरएसएसची विचारधार समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. ज्या पक्षात प्रवेश केला त्याची ध्येयं-धोरणं, विचार जाणून घेतले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या फोटोवरुन सोशल मिडीयावर ट्रोल करणाऱ्यांनाही नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. 'नितेश राणेंना ओळखणारे ट्रोल करणार नाहीत', असं त्यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा प्रखर विरोध झाला आहे. शिवसेनेकडून सतीश सावंत यांना कणकवलीतून राणे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. याबाबत बोलताना 'माझ्यापुढे कुणाचंही आव्हान नाही, लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे', अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे.
सदस्यत्वाचा फॉर्म भरुन नितेश राणेंचा भाजपमध्ये प्रवेश | ABP Majha