Forbes Billionaire List : फोर्ब्स 2024 मधील जगातील अब्जाधीशांची यादी (Forbes Billionaire List) जाहीर केली आहे. यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याबाबतची माहिती तुम्हाला असेलच. बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात वृद्ध असणारा अब्जाधीश कोण? याबाबतची माहिती आहे का? तर अमेरिकेचे व्यापारी जॉर्ज जोसेफ (George Joseph)हे जगातील सर्वात वृद्ध अब्जाधीश आहेत. सध्या त्यांचे वय हे 102 वर्ष आहे. 


जॉर्ज जोसेफ यांच्याकडे मोठी संपत्ती आहे. सध्या त्यांचे वय 102 आहे. फोर्ब्स 2024 च्या यादीनुसार जोसेफ यांच्याकडे 1.7 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. या संपत्तीसह ते जगातील सर्वात वृद्ध अब्जाधीश बनले आहेत. जॉर्ज जोसेफ यांची लॉस एंजेलिस येथे मर्करी जनरल कॉर्पोरेशन ही विमा कंपनी देखील आहे. विमा क्षेत्रात त्यांच्या कंपनीचं मोठं काम आहे.  जोसेफ यांची विमा कंपनी ऑटोमोबाईलसह होम आणि फायर यासह विविध विमा उत्पादनांची विक्री करते. ही विमा कंपनी सार्वजनिकपणे व्यापार करते. 


जोसेफ यांनी घरोघरी जाऊन केलं होतं विमा विक्रीचं काम


मिळालेल्या माहितीनुसार, जोसेफ यांनी मोठा संघर्ष केला आहे. सरुवातीला त्यांनी एका विमा कंपनीत काम देखील केलं आहे. ते घरोघरी जाऊन विमा विक्रीचं काम करत होते. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये मर्क्युरी जनरल कॉर्पोरेशनची स्थापना केली. या कंपनीचा महसूल सध्या 4.6 अब्ज डॉलर आहे. मोठी उलाढाल या कंपनीची होते. 


दुसऱ्या महायुद्धात त्यांनी फ्लाइट नेव्हिगेटर म्हणून काम 


जोसेफ यांचा जन्म 1921 मध्ये झाला होता. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण वेस्ट व्हर्जिनिया इथं झाल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठामधून त्यांनी  गणित आणि भौतिकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धात त्यांनी फ्लाइट नेव्हिगेटर म्हणून काम देखील केलं होतं. जोसेफ यांनी उत्तर आफ्रिका आणि इटलीमध्ये 50 मोहिमा यशस्वी केल्या होत्या.  


भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण?


दरम्यान, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हे तुम्हाला माहितच असेल. मुकेश अंबानी हे भारतातीतल सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्या जिंदाल ग्रुपच्या प्रमुख आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणत संपत्ती आहे. 


महत्वाच्या बातम्या:


19 वर्षाची विद्यार्थीनी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, संपत्ती एकूण बसेल धक्का