जगावं की मरावं या मनस्थितीत, नवीन भावांनी आमच्यात विष कालवलं : धनंजय मुंडे
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2019 01:22 PM (IST)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील भाषण मी 17 तारखेला विड्यामध्ये दिलं. त्यानंतर त्याचा व्हिडीओ 19 तारकेला व्हायरल झाला. जर 17 तारखेला बोललो तर मग त्याचं दिवशी त्याची बातमी झाली असती. ती क्लिप एडिट करुन व्हायरल केली आहे.
परळी : पंकजा मुंडे यांच्या विरोधात केलेल्या वक्त्यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “मी जगावं की मरावं या मनस्थितीत”, अशी भावूक प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. नवीन आलेल्या भावांनी आमच्या बहिण-भावाच्या नात्यात विष कालवल्याचा आरोपही मुंडेंनी केला आहे. यापूर्वीही दोन भावांमधे विष पेरुन त्यांना वेगळं केलं होतं. आजही आम्ही त्याची फळं भोगतो आहोत. या पिढीतही आमच रक्ताचं नातं आहे आणि आमच्यातही विष पेरण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजात मला केवळ खलनायक बनवले जात आहे. मी जे बोललो त्या बद्दल आतापर्यंत कधीच माघार घेतली नाही. या सगळ्या प्रकरणाच्या खोलात जाणार असून आमच्या नात्यात कोण विष कालवतं आहे याचा शोध घेणार असल्याचही मुंडे म्हणाले. लोकांना माहिती आहे मी काम कसे करतो त्यांना माहिती आहे की मी कशी नाती सांभाळतो. ज्यांना बदनामाची करायची होती त्यांनी कशीही केली असती तरी चाललं असतं, पण बहीण भावाच्या नात्यात असे विष कालवून ज्यांनी केले त्याला आता जनताचं न्याय देईल असे मुंडे म्हणाले. Pankaja Munde | पंकजा मुंडे सभेदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्या | बीड | ABP Majha माझा आशय समजून घ्या आणि मी माझ्या बहिणीबद्दल असं बोलेन का? असा सवालही मुंडेंनी केला. मला कालपासून वाटत होतं की हे जग सोडून जावं असं वाटतं आहे. मलाही तीन मुली आहे. ज्या घरात महिलांचा वावर बहुसंख्येनं आहे त्या घरातील बहिणी बद्दला मी असं वक्तव्य करेन का?, याचा निकाल जनताचं काय तो करेल असं धनंजय मुंडे म्हणाले. बहीण भावाच्या नात्यात जो कुणी आग लावायचा प्रयत्न केला आहे याचंच वाईट वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील भाषण मी 17 तारखेला विड्यामध्ये दिलं. त्यानंतर त्याचा व्हिडीओ 19 तारकेला व्हायरल झाला. जर 17 तारखेला बोललो तर मग त्याचं दिवशी त्याची बातमी झाली असती. ती क्लिप एडिट करुन व्हायरल केली आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी व्हिडीओ क्लिप असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनंतर माझ्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला. यावर माझी बदनामी केल्याप्रकरणी आम्हीही फिर्याद रात्री दिली पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. ज्या बहिणीसाठी मी मतदारसंघाचा त्याग केला तेचं आज मला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याच्या धक्क्याने पंकजा मुंडे कोसळल्या? | परळी | ABP Majha धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल परळी मतदार संघातील लढत लक्षवेधी झाली असून आरोप प्रत्यारोप झाल्याने निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे यांना भोवळ येऊन त्या खाली पडल्या. यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून धनंजय मुंडे यांनी जे भाषण केले त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. 'धनंजय मुंडे मुर्दाबाद' अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी थेट परळी पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करत अटकेची मागणी करीत घोषणाबाजी केली होती. जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर पंकजा मुंडे समर्थक पोलीस स्थानकातच ठाण मांडून बसले होते. अखेर जुगल किशोर लोहिया यांच्या तक्रारीवरुन परळी शहर पोलीस ठाण्यात अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे 509, 294, 500 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संवंधीत बातम्या पंकजा मुंडे सभेदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्या सोशल मीडियावरचा 'तो' व्हिडीओ बनावट, वक्तव्याचा विपर्यास केला, धनंजय मुंडेंचा खुलासा पंकजा मुंडेंबद्दल 'त्या' अवमानकारक वक्तव्यानंतर समर्थक आक्रमक, धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल