Nawapur Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्रातील एकूण 288 जागांसाठी विधानसभा निवडणुकीचे निकाल आज स्पष्ट होत आहेत. या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. त्यात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा दिसून आली. (Nawapur Vidhan Sabha Constituency) चौथा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसचे शिरीष नाईक (Shirish Naik) विजयी झाले आहेत. तर भरत गावित (Bharat Gavit) आणि शरद गावित (Sharad Gavit) हे नाईक यांच्याविरुद्ध रिंगणात उभे होते. यंदा या निवडणूकीची अनोखी झलक पाहायला मिळाली


नवापुर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत 


शिरीष नाईक - काँग्रेस.1121 मतांनी विजयी
भरत गावित - राष्ट्रवादी (अजित पवार गट).
शरद गावित - अपक्ष.


या मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या समोर महायुती आणि अपक्ष उमेदवाराचे आव्हान होते. 


2019 च्या निवडणुकीत काय झाले?


2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेसचे शिरीष कुमार निवडणुकीच्या रिंगणात होते, तर भाजपचे भरत माणिकराव आणि अपक्ष शरद गावित निवडणुकीच्या रिंगणात होते. गेल्या निवडणुकीत या तिघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. अपक्ष उमेदवाराने येथून काँग्रेस पक्षाला कडवी झुंज दिली होती, तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर होता. निवडणूक निकालांबद्दल बोलायचे झाले तर शिरीषकुमार नाईक यांना एकूण 74,652 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार शरद गाव यांना 63,317 मते मिळाली. भाजपचे भरत माणिकराव तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांना एकूण 58,579 मते मिळाली. काँग्रेसचे शिरीष कुमार यांनी अपक्ष उमेदवार शरद गाव यांचा 11,335 मतांनी पराभव केला.


मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?


महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections/amp  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.


हेही वाचा>>>


Nandurbar Vidhan Sabha Constituency: नंदुरबारमध्ये कोणी मारली बाजी? तडवी कि गावित? कोणी उधळला विजयाचा गुलाल?