Navi Mumbai Election Reservation 2022 : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं आज आरक्षण सोडत जाहीर केली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण सोडतीद्वारे (ड्रॉ) निश्चित करण्यात आलं. त्यासाठीचा कार्यक्रम मनपाच्या निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आला होता.
महानगरपालिका एकूण नगरसेवक संख्या : 122
प्रभाग संख्या : 41
दोनचे पॅनल : 01
तीनचे पॅनल : 40
अनुसूचित जाती : 11 जागा
अनुसूचित जमाती : 02 जागा
सर्वसाधारण : 109 जागा
महिला आरक्षित : 61
महिला आरक्षण : अनुसूचित जाती : 06
महिला आरक्षण : अनुसूचित जमाती : 01
महिला सर्वसाधारण : 54
'या' दिग्गजांचं आरक्षण सुरक्षित
विजय चौगुले : माजी विरोधीपक्ष नेते : सुरक्षीत आरक्षण
अनिल कौशिक : अध्यक्ष : क्राँग्रेस : सुरक्षित आरक्षण
अशोक गावडे : अध्यक्ष : राष्ट्रवादी : सुरक्षित आरक्षण
सुधाकर सोनवणे : माजी महापौर : सुरक्षीत आरक्षण
मंदाकिनी म्हात्रे : सुरक्षीत आरक्षण
रामचंद्र घरत : अध्यक्ष : भाजप : सुरक्षित आरक्षण.
जयवंत सुतार : माजी महापौर : सुरक्षित आरक्षण.
सुरेश कुलकर्णी : माजी स्थायी समिती अध्यक्ष : सुरक्षित आरक्षण
नवी मुंबई मनपा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षापासून आमदार गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असल्याने यावेळी ती खेचून घ्यायचीच, असा चंग या तीन पक्षांनी केला आहे.
नवी मुंबई महानगर पालिका- 2015 मधील पक्षीय बलाबल (एकूण जागा : 111)
राष्ट्रवादी : 57
शिवसेना : 38
भाजपा : 06
काँग्रेस : 10
गेल्या दोन वर्षात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्याने बदललेले पक्षीय बलाबल सध्याची स्थिती
भाजपा : 51 (गणेश नाईक गट)
शिवसेना : 50
राष्ट्रवादी काँग्रेस : 4
काँग्रेस : 6
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होणं अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी महापालिका क्षेत्रात 11 नवीन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण प्रभागांची संख्या 111 वरून 122 वर गेली आहे. सोमवारी मध्यरात्री नवीन प्रभाग रचना महापालिका प्रशासनानं पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे.