नवी मुंबई :  "मावळमध्ये नवख्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली तर त्याला सांभाळून घ्या," असं भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. नवी मुंबईमध्ये काल (13 मार्च) अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चत झाल्याचे संकेत दिले.


तुम्ही मला काय विचारणार हे माहित आहे? : पार्थ पवार

पार्थ पवारसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेतली. यानंतर पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा जोर आणखीच वाढला आहे. मंगळवारी पार्थ पवार यांनी रायगडसह पिंपरी चिंचवड, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पत्रकार : पार्थसाठी पनवेलमध्ये आलात? अजित पवार म्हणाले...

यानंतर नवी मुंबईत काल अजित पवारांनीही शेकापच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, "पक्षाने तरुणांना संधी देण्याचा विचार केला आहे. उद्या पक्ष कोण उमेदवार देतो याचा निर्णय यायचा आहे. कदाचित उमेदवार नवखाही येण्याची शक्यता आहे. जर नवखा आला तर त्याला सांभाळून घ्या, अनुभवी आला तर प्रश्नच नाही. या गोष्टीचा विचार सर्व सहकाऱ्यांनी करावा."