Nashik Election Results 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर (Nashik Elecion Results 2026) नाशिकमध्ये राजकीय तणाव वाढल्याचे चित्र आहे. नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद मोरे (Sharad More) यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Continues below advertisement

शरद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी त्यांच्यावर कानशिलात लगावत मारहाण केली. या घटनेदरम्यान मारहाण करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला महिलांनीच चोप दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हल्ला करणाऱ्या तरुणाच्या कमरेला बंदूक असल्याचेही मोरे यांनी सांगितले आहे.

Nashik Election Results 2026: पवन पवार समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप 

दरम्यान, पोलीस दप्तरी फरार असलेल्या पवन पवार यांच्या मातोश्री प्रभाग 18 मधून निवडणूक लढवत होत्या. त्यांचा पराभव झाल्यानंतर पवन पवार समर्थकांनीच आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप शरद मोरे यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी रात्री उशिरा शरद मोरे यांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.

Continues below advertisement

Nashik Election Results 2026: सोमवार पेठेतही गोंधळ

दरम्यान, प्रभाग क्रमांक 13 मधील सोमवार पेठ परिसरातही तणावपूर्ण घटना घडली. शिवसेनेचे पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर अज्ञात तरुणांनी फटाके फोडून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. मात्र, परिसरातील रहिवाशांनी मध्यस्थी केल्याने वाद पुढे वाढला नाही. या प्रकरणी गणेश मोरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निवडणुकीनंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी संबंधित भागात बंदोबस्त वाढवला असून, दोन्ही घटनांचा तपास सुरू आहे.

Nashik Election Result 2026:नाशिक महानगरपालिकेचा निकाल

एकूण  जागा : 122 भाजप - 72शिंदेंची शिवसेना - 26ठाकरेंची शिवसेना - 15राष्ट्रवादी अजित पवार - 04काँग्रेस - 03मनसे - 01अपक्ष - 01

Nashik Election Result 2026: नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता

नाशिक महापालिकेवर शंभर प्लसचा नारा देणाऱ्या भाजपने 72 जागा जिंकत महापालिकेवर पुन्हा एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपला आव्हान देऊन महापौर पदाचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदेसेनेच्या झोळीत नाशिककरांनी अवघ्या 26 जागा टाकल्या. ठाकरे गटाने 15 जागा जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, भाजपने गतवेळेपेक्षा सहा जागा अधिक मिळवत पुन्हा वर्चस्व मिळवले. मनपात बहुमताचा आकडा 62 असून, भाजपच्या 72 जागा निवडून आल्याने त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 

आणखी वाचा 

Nashik Election Results 2026: नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' झाली लढत, पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर