A R Rehman on Chhava: बॉलिवूडमधला ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट छावाने 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमावला. गेल्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी तो आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. नुकताच एका मुलाखतीत ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत देतानाचा अनुभव कसा होता हे सांगितलय. यावेळी छावा चित्रपट फूट पडणारा असल्याचं असं त्यांनी म्हटलं.
छावा चित्रपटानंतर नागपूर येथे उसळलेल्या दंगली, एका वक्तव्यानंतर उफाळलेला राग, हिंसाचार, जाळपोळ ते औरंगजेबाच्या कबरीपर्यंत घडलेल्या सर्वच प्रकारानंतर मोठा संताप व्यक्त केला गेला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार या दंगलीच कारण औरंगजेबाबत आपला संताप व्यक्त करणारे लोक होते.
काय म्हणाले ए आर रहमान?
बीबीसी एशियन नेटवर्क चे पत्रकार हरून रशीद यांनी ए आर आर रहमान यांना एक प्रश्न विचारला. त्यावर ए आर रहमान यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. ते म्हणाले,' माझ्या मते या चित्रपटात विभाजन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण चित्रपटाच्या कथेचे मूळ हे शौर्य आहे. मी दिग्दर्शकाला विचारलेलं की मीच या चित्रपटाला संगीत द्यावं असं का वाटतं? त्यावेळी त्याने मला या चित्रपटासाठी मीच योग्य असल्याचा सांगितलं. त्याने मला सांगितलेलं की हा चित्रपट खूप छान आहे.'
ते पुढे म्हणाले,' पण प्रेक्षक हुशार आहे. चित्रपटांचा त्यांच्यावर प्रभाव होत नाही. काय खरं आहे काय खोटं याची त्यांना जाणीव असते. छावा चित्रपटाला म्युझिक दिल्याबद्दल मला खूप अभिमान असल्याचं रहमान यांनी म्हटलं. छावा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाच्या रक्ताप्रमाणे आहे. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा एका लहान मुलीला तुम्ही कविता म्हणताना पाहता ते दृश्य सर्वात सुंदर आहे. या चित्रपटाला संगीत दिल्याचा मला अभिमान आहे. छावा चित्रपटात काही वाईट घडत असताना सुभानल्लाह आणि अल्लाहमदुल्लाह हे दोन शब्द पात्र म्हणताना दिसतात यावरही रहमान यांनी प्रतिक्रिया दिलीये. 'हे वाईट आहे. माझा लोकांवर विश्वास आहे. चुकीच्या माहितीचा त्यांच्यावर प्रभाव होणार नाही' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही चित्रपट चुकीचे हेतूने...
ते म्हणाले," हेच कारण आहे की देव आमच्या सारख्या लोकांना शक्तिशाली बनवत आहे. जेणेकरून आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून चांगल्या गोष्टींनी वाईट गोष्टींवर मात करू शकू. दरम्यान चित्रपट निवडताना तुम्ही सतर्क झाला आहात का असा प्रश्न विचारला असता काही चित्रपट चुकीचे हेतूने बनवण्यात येतात त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो असे ए आर रहमान यांनी म्हटले.
दरम्यान नितेश तिवारी दिग्दर्शित आणि निमित्त मल्होत्रा निर्मित रामायण या चित्रपटात ए. आर. रहमान यांनीच संगीत दिलं आहे. मुस्लिम असूनही या प्रकल्पावर काम करत असल्याबद्दल सुरु झालेल्या चर्चांवर उत्तर देताना कला आणि ज्ञान यांना धार्मिक सीमांमध्ये बांधता येत नाही असं ठाम उत्तर त्यांनी दिलं.
