लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदींचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनवरुन उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमंत्रण स्वीकारलं. उद्धव ठाकरे आणि सचिव मिलिंद नार्वेकर वाराणसीत पोहोचले आहेत.
त्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जोरदार शक्तीप्रर्शन करत 30 मार्चला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळीही उद्धव ठाकरे यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. यापूर्वी सेना-भाजप युतीची घोषणा करताना शाह-उद्धव यांनी एकत्र येत गळाभेट घेतली होती.
नरेंद्र मोदींची मुंबईत सभा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसीत अर्ज दाखल केल्यानंतर, मोदी मुंबईत येणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता मुंबईतल्या वांद्र्यात महायुतीची जाहीर सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसह महायुतीतल्या सर्वच घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
VIDEO | नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे उपस्थित राहणार | एबीपी माझा
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी वाराणसीत नरेंद्र मोदींनी भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शन केलं होतं. या रोड शोमध्ये मोठ्या प्रमाणावर मोदी समर्थक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मतदारांना मोदींनी अभिवादन केलं. दशश्वामेध घाटावर मोदींनी गंगेची आरती केली.
लातूरमधील औसामध्ये 9 एप्रिलला झालेल्या सभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे तब्बल अडीच वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी हातात हात घालून मोदी आणि उद्धव यांनी मंचावर प्रवेश केला होता. 'शिवसेना पक्षप्रमुख आणि धाकटे बंधू उद्धव ठाकरे' असा उल्लेख करत पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली होती.
UNCUT | सत्तेसाठी लाचार झालेल्या शिवसेनेनं युती केली, राज ठाकरे यांचं भाषण | पनवेल | एबीपी माझा