Narendra Modi on Uddhav Thackeray, मुंबई : "मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतांचं शहर आहे. मुंबई स्वाभिमानाचं शहर आहे. मात्र, आघाडीमध्ये एक असा पक्ष आहे. ज्याने बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे. त्यामुळे मी त्यांना आव्हान दिले होते की, काँग्रेसच्या शहाजाद्याच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंबाबत कौतुकाचे काही शब्द बोलवून घ्या. काँग्रेसच्या शहाजाद्याला हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलायला सांगा. हे तुम्ही करुन घेतलं तर तुम्हाला चांगली झोप येईल, हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते मुंबईतील सभेत बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, मविआच्या राजकारणापासून आणि त्यांच्यापासून सावधान राहायचे आहे. महायुती स्वप्नांना पूर्ण करणारे बंधन आहे. मध्यमवर्ग ज्याने दशकांपासून स्वप्न नाही, बघितले त्याचे स्वप्न पूर्ण होत आहेत. आम्ही स्टार्टअप इंडिया सुरु केला, मुंबईत मोठ्या प्रमाणात स्टार्टअप येतायत. वो मीडलक्लास ज्याला गृहकर्ज मिळत आहे. मीडसक्लास भविष्याबद्दल निश्चिंत आहे. 70 लाख रेडीपटरी वाल्यांना आपला व्यापार वाढायला मदत मिळाली आहे. मुंबईत आमच्या 1 लाख पेक्षा अधिक रेडीपटरीवाल्यांना रोजगार मिळाला आहे. सेवाभावनाने काम भाजप आणि महायुतीच करु शकते. मी नम्रतापूर्वक सांगतो आपल्याला जबाबदारीने सांगतो. आपले स्वप्न आमचे संकल्प आहेत, मोदी आपल्या स्वप्नांना जगतो आणि पूर्ण करण्यासाठी मेहनत करत गॅरंटी देतो.
लाखो कोटी रुपयांची कामं मुंबईत सुरु आहेत. महामार्ग मेट्रो, विमानतळ वेगाने कामं होतायत. देशात काँग्रेसचं सरकार राहिलं मात्र मुंबईला घेऊन फॉरवर्ड प्लानिंग नाही केलं. मुंबई त्यामुळे मागे गेली. मुंबईचा स्वभाव आहे इमानदारी आणि मेहनत, मात्र काँग्रेसचा भ्रष्टाचार, अडथळे आणणे आहे. अटल सेतू, मेट्रोचा विरोध हे करत होते. डिजिटल इंडिया आणि युपीआयचं बोलत होतो तेव्हा मजाक उडवत होते. ही लोकं मुंबईला पुढे नाही घेऊन जाऊ शकत. आम्ही जोडायला पुढे येतो मात्र मविआ तोडायची भाषा करते. मुंबई अनेक भाषांची लोकं येतात मात्र मविआ भांडणं लावते.
इतर महत्त्वाच्या बातम्या