अकोला : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील उडी घेतली आहे. त्यांनी आज अकोल्यात एका सभेला संबोधित केलं. या सभेत त्यांनी काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती प्रवर्गातील जातींमध्ये भांडण लावू पाहात आहे, असा आरोप केला. तसेच काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वळोवेळी अन्याय केला, असाही दावा केला. सोबतच त्यांनी 'एक हैं तो सेफ हैं' असं म्हणत मतविभाजन टाळण्याचा सल्ला दिला.
काँग्रेसला एससी समाजाला कमजोर करायचंय
"अनुसूचित जाती प्रवर्गतील वेगवेगळ्या जातींमध्य एकमेकांशी भांडण व्हावे, असे काँग्रेसला वाटतं. एसी समाजाच्या वेगवेगळ्या जाती आपापसात भांडत राहिल्या तर त्यांचा आवाज कमी होईल, हे काँग्रेसला माहिती आहे. असं झालं तर काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे चांभार आणि मातंग जातीत भांडण व्हावे असे काँग्रेसला वाटत आहे. काँग्रेसला मातंग जातीला महार जातीविरुद्ध उभं करायचं आहे. कैकाडी समाजाला खाटिक जातीशी काँग्रेसला लढवायचं आहे. एससी प्रवर्गाच्या माध्यमातून तुम्ही एकत्र न राहता भांडण करत राहिले तर त्याचा काँग्रेस फायदा उचलणार आहे. एससी समाजाला कमजोर करून काँग्रेसला सरकार स्थापन करायचंय. काँग्रेसची ही चाल आहे. काँग्रेसचे हेच चरित्र आहे. म्हणूनच तुम्हाला काँग्रेसच्या या चालीपासून तुम्ही सावध राहायचे आहे. तुम्ही 'एक हैं तो सेफ हैं' हे लक्ष ठेवायचं आहे," असं मोदी म्हणाले.
काँग्रेसच्या शाही परिवाराने आंबेडकरांना वारंवार अपमानित केलं
"हरियाणात तेथील लोकांनी काँग्रेसला धुळ चारली. काँग्रेसच्या काळात तेथे दलितांविरोधात दंगे झाले. काँग्रेस दलितांना मारणाऱ्यांच्या सोबत राहिली. हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांसोबत आधी जे केले तेच आज केले जात आहे. पंडित नेहरुंपासून ते आजपर्यंत काँग्रेसच्या शाही परिवाराने आंबेडकरांना वारंवार अपमानित केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही मोठ्या कामाचे श्रेय काँग्रेसने आंबेडकरांना दिलेले नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून देशात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र काँग्रेसने हे श्रेयदेखील बाबासाहेब आंबेडकर यांना दिले नाही," असा दावा मोदी यांनी केला.
शाही परिवाराने या पंचतीर्थांना कधी भेट दिली असेल तर सांगावे
"काँग्रेसने छळ करून डॉ. आंबेडकरांना पराभूत केले. माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे धोरण माझ्यासाठी नेहमीच प्रेरक राहिलेले आहे. आमच्या सरकारने आंबेडकरांचे योगदाने जगभरात मोठ्या प्रखरतेने मांडले आहे. आम्ही आंबेडकर जेथे-जेथे राहिले त्या ठिकाणांना पंचतीर्थ म्हणून घोषित केलेलं आहे. हे पंचतीर्थ आगामी पिढ्यांना प्रेरित करत राहील. मी शाही परिवाराला आव्हान देतो की या परिवाराच्या चार पिढ्या भारतावर राज्य केलं. या शाही परिवाराने या पंचतीर्थांना कधी भेट दिली असेल तर ते देशासमोर ठेवावे. मी या सर्व पंचतीर्थांना भेट देऊन नमन करून आलेलो आहे," असंही मोदी म्हणाले.
Narendra Modi Video News :
हेही वाचा :
मोठी बातमी! मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडे यांची सांगलीत हत्या, कुऱ्हाडीने केले वार