Continues below advertisement


नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दणदणीत विजय मिळवला. भाजप, जदयू, लोजपा रामविलास, हिंदुस्थानी आवाम मोर्चा यांच्या एनडीएनं 202 जागांवर विजय मिळवत पुन्हा बिहारची सत्ता मिळवली आहे. भाजपनं बिहारच्या विजयानिमित्त विजयोत्सव दिल्लीत आयोजित केला होता. त्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारच्या जनतेनं पुन्हा सत्ता सोपवल्याबद्दल त्यांना नमन करतो, असं मोदी म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणखी एकदा फुटणार असल्याचं म्हटलं.


नरेंद्र मोदींनी बिहारच्या जनतेनं सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिल्याचं म्हटलं सर्व पक्षांतर्फे बिहारच्या जनतेला नमन करतो, असं मोदी म्हणाले. नरेंद्र मोदींनी यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना नमम करत असल्याचं मोदी म्हणाले. बिहारमध्ये काही पक्षांनी मुस्लीम यादव फॉर्म्युला बनवला होता. मात्र, आजच्या विजयानं हे समीकरण बदलून महिला आणि युवा असं झालं आहे.


नरेंद्र मोदींनी आता बिहारमध्ये पुन्हा कट्टा संरकार कधी येणार नाही, असं म्हटलं. निवडणूक प्रचारात बिहारच्या जनतेला रेकॉर्डब्रेक मतदानाचा आग्रह केलेला, बिहारच्या लोकांनी सर्व रेकॉर्ड मोडले, एनडीएला प्रचंड मोठा विजय मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं, त्याला बिहारच्या जनतेनं साथ दिली, असं मोदी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या या विजयामुळं निवडणूक आयोगावरील लोकांचा विश्वास मजबूत झाल्याचं म्हटलं. गेल्या काही वर्षात मतदानातील टक्केवारी वाढली आहे. निवडणूक आयोगासाठी ही चांगली बाब राहिली आहे. बिहार कधी काळी माओवाद्यांमुळं त्रस्त होता. नक्षलवाद प्रभावित भागात 3 वाजता मतदान बंद करावं लागत होतं, आता एकाही ठिकाणी तसं होत नसल्याचं मोदी म्हणाले.


नरेंद्र मोदी यांनी पुढं म्हटलं की देशातील मतदारांनी, युवा मतदारांनी SIR ला गांभीर्यानं घेतलं आहे. बिहारच्या युवा मतदारांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. आता प्रत्येक पक्षानं पोलिंग बूथवर पार्टीतील लोकांना सक्रीय करावं आणि SIR च्या कामाशी सोडून घ्यावं, असं मोदी म्हणाले. बिहारची ही भूमी आहे ज्याला भारताच्या लोकशाहीची जननी म्हटलं जातं. त्याच धरतीनं लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या शक्तींना धूळ चारली आहे. बिहारनं पुन्हा दाखवलं असत्य पराभूत होतं, लोकांचा विश्वास जिकंतो, असं मोदी म्हणाले. बिहारनं दाखवून दिलं की जामीनावर असलेल्या लोकांना जनता साथ देणार नाही. देश आता खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. प्रत्येक कुटुंबाला संधी, सन्मान आणि समानता मिळावी, असं त्यांना वाटत, मोदींनी म्हटलं. भारताच्या जनतेला केवळ विकास हवाय, असं मोदी म्हणाले.


काँग्रेस आणखी एकदा फुटणार : नरेंद्र मोदी 


ज्या पक्षानं दशकांपर्यंत देशावर राज्य केलं , त्यांच्यावरील जनतेचा विश्वास सातत्यानं घसरत आहे. काँग्रेस अनेक राज्यात कित्येक वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. बिहारमध्ये 35 वर्ष, गुजरातमध्ये 30 वर्ष, उत्तर प्रदेशात चार दशक आणि पश्चिम बंगालमध्ये पाच दशकांपासून काँग्रेस सत्तेत परत आली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सहा राज्यात विधानसभा निवडणूक झाली. सहा राज्य मिळून काँग्रेसचे शंभर आमदार विजयी झाले नाहीत. आम्ही आज जिंकलो तितक्या जागाही सहा राज्यात काँग्रेसला मिळवता आल्या नाहीत.काँग्रेसच्या राजकारणाचा आधार नकारात्मक राजकारण झाला आहे. चौकीदार चौर हे का नारा, संसदेचा वेळ वाया घालवणं, प्रत्येक संस्थावर हल्ले करणे, कधी ईव्हीएमवर प्रश्न, निवडणूक आयोगाला शिव्या, मतचोरीची रचलेल्या गोष्टी, देशाच्या दुश्मनांचा अजेंडा पुढं आणण्याचं काम काँग्रेस करतेय. काँग्रेसकडे देशाच्या विकासाचा अजेंडा नाही. आज काँग्रेस मुस्लीम लीगी मावोवादी काँग्रेस झालीय, अशी टीका मोदींनी केली. काँग्रेसचा पूर्ण अजेंडा यावर चालतो, त्यामुळं काँग्रेसच्या आत एक वेगळा गट निर्माण होतोय, जो नकारात्मक राजकारणामुळं अस्वस्थ आहे. काँग्रेसच्या नामदारांप्रती खूप नाराजी वाढलीय. येत्या काळात काँग्रेसचं मोठं विभाजन होईल, असं मोदी म्हणाले. काँग्रेस आपल्या नकारात्मक राजकारणात एकाच वेळी सर्वांना बुडवत आहे, मोदींनी म्हटलं.