Nanded District Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नांदेड जिल्ह्यात देखील वेगवान घडामोडी घडत आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे (Nanded District Vidhan Sabha Election) 9 मतदारसंघ आहेत. तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे. नांदेड लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) काँग्रेसचे वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांचा विजय झाला होता. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांचा पराभव केला होता. मात्र, निवडणुकीनंतर काही काळातच वसंतराव चव्हाण यांचं अल्पशा आजारानं निधन झालं होतं. आता या जागेवर देखील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान, विधानसबा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलेआहे. नांदेडे जिल्ह्यात 64.92 टक्के मतदान झाले आहे.
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महाविकास आघाडी उमेदवार | महायुती उमेदवार | वंचित/ अपक्ष उमेदवार | विजयी उमेदवार |
1 | किनवट विधानसभा | प्रदिप नाईक (राष्ट्रवादी शरद पवार) |
भीमरावं केराम (भाजप) | ||
2 | हदगाव विधानसभा | माधव पाटील जवळगांवकर (काँग्रेस) |
बाबुराव कदम (शिवसेना शिंदे गट) | ||
3 | भोकर विधानसभा | पप्पू पाटील कोणढेकर (काँग्रेस) | श्रीजया चव्हाण (भाजप) | ||
4 | उत्तर नांदेड विधानसभा |
अब्दुल सत्तार (काँग्रेस) | बालाजी कल्याणकर (शिवसेना शिंदे गट) | संगीता पाटील (शिवसेना ठाकरे गट) मिलिंद देशमुख (भाजप बंडखोर) | |
5 | दक्षिण नांदेड विधानसभा | मोहन हंबर्डे (काँग्रेस) | आनंद पाटील बोनदारकर (शिवसेना शिंदे गट) | दिलीप कंदकुर्ते (भाजप बंडखोर) | |
6 | लोहा विधानसभा | लोहा विधानसभा एकनाथ पवार (शिवसेना ठाकरे गट) | प्रताप पाटील चिखलीकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) | आशा शिंदे (अपक्ष) | |
7 | नायगाव विधानसभा | मिनल खतगावकर (काँग्रेस) | राजेश पवार (भाजप) | ||
8 | देगलूर विधानसभा |
निवृत्ती कांबळे (काँग्रेस) | जितेश अंतपूरकार (भाजप) | सुभाष साबणे (प्रहार) | |
9 | मुखेड विधानसभा |
हणमंत पाटील बेटमोगरेकर (काँग्रेस) | तुषार राठोड (भाजप) | बालाजी खतगावकर (बंडखोर शिंदे शिवसेना) |
नांदेड जिल्ह्यातील लढती
किनवट विधानसभा मतदारसंघात
किनवट विधानसभा भीमरावं केराम (भाजप) विरुद्ध प्रदिप नाईक (राष्ट्रवादी शरद पवार)
हदगाव विधानसभा मतदारसंघ
माधव पाटील जवळगांवकर (काँग्रेस) विरुद्ध बाबुराव कदम शिंदे गट
भोकर विधानसभा मतदारसंघ
श्रीजया चव्हाण (भाजप) विरुद्ध पपू पाटील कोणढेकर (काँग्रेस)
उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघ
बालाजी कल्याणकर (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध अब्दुल सत्तार (काँग्रेस) विरुद्ध संगीता पाटील (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध मिलिंद देशमुख (भाजप बंडखोर)
दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघ
मोहन हंबर्डे (काँग्रेस) विरुद्ध आनंद पाटील बोनदारकर (शिवसेना शिंदे गट) विरुद्ध दिलीप कंदकुर्ते भाजप बंडखोर
लोहा विधानसभा मतदारसंघ
लोहा विधानसभा एकनाथ पवार (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर (राष्टरवादी अजित पवार गट) विरुद्ध आशा शिंदे
नायगाव विधानसभा मतदारसंघ
राजेश पवार (भाजप) विरुद्ध मिनल खतगावकर (काँग्रेस)
देगलूर विधानसभा मतदारसंघ
जितेश अंतपूरकार (भाजप) विरुद्ध निवृत्ती कांबळे (काँग्रेस० विरुद्ध सुभाष साबणे (प्रहार)
मुखेड विधानसभा मतदारसंघ
तुषार राठोड (भाजप) विरुद्ध हणमंत पाटील बेटमोगरेकर (काँग्रेस) विरुद्ध बालाजी खतगावकर (बंडखोर शिंदे शिवसेना)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया काल पार पडली. यामध्ये नांदेड जिल्ह्यात 64.92 टक्के मतदान झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात किती मतदान?
भोकर - 75 टक्के
नांदेड उत्तर - 56 टक्के
नांदेड दक्षिण - 58 टक्के
नायगाव - 69 टक्के
देगलूर - 59 टक्के
मुखेड - 59.78 टक्के
लोहा - 67.61 टक्के
हातगाव - 70.40 टक्के
किनवट - 70.5 टक्के