Maharashtra Election 2024 : उत्तर प्रदेशातच योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आपले राजकारण ठेवावं, ते शाहू-फुले-आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा महाराष्ट्र आणू नये. महाराष्ट्रात या प्रकारचं घाणेरडा राजकारण होत नाही. मात्र महाराष्ट्रातील त्यांच्याच या सरकारमध्ये कधी उर्स तर कधी गणेश उत्सवावर हल्ला केला जातोय. महाराष्ट्रात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई, महिला सुरक्षा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. सरकार म्हणून या मुद्द्यावर हे लोक बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्राला कर्जात बुडावण्याचे काम केलंय. त्यावर त्यांनी बोललं पाहिजे. राज्याच्या इंडस्ट्री गुजरातमध्ये पाठवण्याचा काम केलं जातंय. तिथं योगी यांनी हिंदू-मुस्लिम करू नये, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचावर टीका केलीय.  


महायुतीच्या लोकांना बोलायचा आहे तर नवाब मलिक यांच्याबद्दल बोलायला पाहिजे, उद्या दाऊदही यांच्या पक्षातून उभा व्हायला आला तर ते तयार होऊन जातील. राज्यात सध्या पॉवर जिहाद सुरू आहे. नवाब मलिक यांच्या बाबत जनतेला यांनी सांगितलं पाहिजे. नवाब मलिकांना 17 महिने यांनीच तुरुंगात पाठवले होते, ते आता यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे इथे येऊन बटेंगे की कटिंगे असं बोलतात. त्यांनी महाराष्ट्रातील मुद्द्यांवर बोलावं हे महाराष्ट्र जनता अजिबात स्वीकारणार नाही. असेही नाना पटोले  म्हणाले.


भाजप शेतकरी विरोधी आहे- नाना पटोले


भाजप शेतकरी विरोधी आहे आणि शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांचे फायद्याचे ते काही करणार नाही. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, सोयाबीन, कापूस असेल या सगळ्या पिकांना आणि दुधाला एमएसपी पेक्षा जास्त भाव देण्याची भूमिका काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची राहील. निवडणूक नियमात जे काही असतील चौकशी होतच राहते,  त्यावर राजकारण होऊ शकत नाही.शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.