Nagpur Central VidhanSabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या "नागपूर मध्य" विधानसभा मदादारसंघातील अतितटीच्या लढतीत अखेर भाजपने अखेर हा गड राखला आहे. नागपूर मध्यमधून भाजपचे प्रवीण दटके यांनी 12 हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी संपादन करत काँग्रेसच्या बंटी शेळके यांचा पराभव केला आहे. संघाचे मुख्यालय असलेला मतदारसंघ हिसकावण्यासाठी काँग्रेसने पूर्ण शक्ती पणाला लावली होती. यासाठी प्रियंका गांधी यांनी ही विशेष हजेरी लावत शक्तिप्रदर्शन केलं होतं. दरम्यान, निकालाच्या दिवशीही मोठा राजकीय राडा या मतदारसंघात झाला होता. मात्र अखेर भाजपचे प्रवीण दटके यांनी भाजपचा गड अभेद्य राखला आहे.
मध्य नागपुरात भाजप बालेकिल्ला राखणार?
दरम्यान राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपुरातील 12 मतदारसंघासह मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात (Nagpur Central Assembly Constituency) यंदा कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. कारण गेल्या तीन टर्म पासून भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातील जातीय समीकरण बघता विधानसभेसाठी यंदा काट्याची टक्कर राहणार आहे. मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम तसेच हलबा समाजाच्या मतदारांची लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे हे जातीय समीकरण जुळवून विजयाचा मार्ग सुखर होऊ शकतो. मात्र भाजपने यंदा मागील वेळी काठावर पास झालेले विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना विश्राम देत प्रवीण दटके (Pravin Datke) यांना पुन्हा नव्याने संधी दिली आहे. या संधीचे मात्र त्यांनी आता सोनं केलं आहे.
तिरंगी लढतीत भाजपची बाजी!
मागील तीन विधानसभा निवडणुकांपासून मध्य नागपूर भाजपचा गड असला तरी येथे सातत्याने घटते मताधिक्य ही पक्षासमोरील मोठी चिंता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून तरुण आणि तडफदार नेते बंटी शेळके (Bunty Shelke) यांना मैदानात उतरवत ही लढत अधिक रंगतदार झाली आहे. यंदा मध्य नागपुरात काँग्रेसकडून सुरवातीला ॲड. नंदा पराते आणि रमेश पुणेकर यांच्या नावाची चर्चा होती. तर भाजप कडूनही विद्यमान आमदार विकास कुंभारे, दीपक देवघरे, दीपराज पार्डीकर यांच्या नावाची चर्चा होती. परंतु काँग्रेसने बंटी शेळके यांना तर भाजपने प्रविण दटके यांना उमेदवारी जाहिर केली. त्यानंतर हलबा समाजातील सगळ्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विविध हलबांशी संबंधित संघटना संतापल्या. दरम्यान हलबा समाजातील एक अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांनी देखील मैदानात उतरत ही लढत तिरंगी केली आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण गुलाल उधळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पक्ष | 2024 | 2019 | 2014 |
भाजप | ९६,९०५ | ९६,३४६ | ९४,१६२ |
काँग्रेस | ७१,०४४ | ७३,८४९ | ५४,२१५ |
बसपा | १,०४९ | १ ६९२ | ५ ३७६ |
मध्य नागपूर विधानसभा, लोकसभेतील मतांची गोळाबेरीज
विधानसभा 2019
विकास कुंभारे - (भाजप)- ७५,६९२
बंटी शेळके - (काँग्रेस)- ७१,६८४
विधानसभा 2024
विकास कुंभारे - भाजप - ८७,५२३
अनीस अहमद - काँग्रेस- ४९.४५२
ओंकार अंजीकर - बसपा- ५,५३५
आभा पांडे- ४,८१८
मो. कामिल अन्सारी - राष्ट्रवादी काँग्रेस- ४,४४९
विधानसभा 2009
विकास कुंभारे - भाजप- ५६,३१२
राजू देवघरे - काँग्रेस- ४५, ५२१
हाजी गनी खान बसपा- २४,०३४
रवींद्र दुरुगकर अपक्ष ९, १५७
नंदा पराते - डीईएसईपी ४,९३९
हे ही वाचा