मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील (Andheri East Bypoll 2022) शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे.

Continues below advertisement

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मशाल हे चिन्ह आपल्यासाठी नवीन आहे. छगन भुजबळ 1985 साली या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मशाल हे चिन्ह आपल्यासाठी  शुभ आहे, असे देखील लटके म्हणल्या. 

महापालिकेनं राजीनामा स्वीकारल्याच्या पत्रात काय म्हटलंय?

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने, मा. उच्च न्यायालयातील मा. न्यायमूर्ती नितीन जामदार तसेच मा. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दि. 13.10.2022 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार, आपल्या उपरोक्त विषयासंदर्भातील 3.10.2022 रोजीच्या अर्जाबाबत कळविण्यात येते की, आपला बृहन्मुंबई महापालिकेचा राजीनामा 13.10.2022 (कार्यालयीन वेळेनंतर) पासून स्वीकृत करण्यात येत आहे.

Continues below advertisement

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एबीपी माझाशी बोलताना मुरजी पटेल यांनी 30 हजारपेक्षा जास्त मतांनी जिंकून येईन असा विश्वास व्यक्त केलाय.

अंधेरी पूर्वची जागा शिंदे गट लढवणार की भाजप हा तिढा आता सुटला असून मुरजी पटेल यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही जागा आता शिंदे गटाला न जाता या ठिकाणी भाजप निवडणूक लढणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल हा सामना रंगणार आहे.