जळगाव : मुक्ताई नगर मतदार संघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांनी त्यांच्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केल्याचा दावा केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर विनोद सोनावणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. हा गोळीबार करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर मतदार संघात महायुती कडून आमदार चंद्रकांत पाटील हे उमेदवार आहेत. महाविकास आघाडी कडून रोहिणी खडसे या उमेदवार आहेत.त्याच बरोबर विनोद सोनावणे हे अपक्ष उमेदवारी करत आहेत. काल त्यांच्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली होती. सोनावणे यांच्या कारवर गोळ्या लागल्यानं अनर्थ टळला होता. पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य पाहता तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
विनोद सोनवणे हे बोदवड तालुक्यात राजूर गावात आपल्या वाहनातून प्रचार करत असताना ,दुचाकी वरून आलेल्या तिघांनी आपल्या वाहनावर गोळीबार केल्याचा दावा केला होता. हा घातपाताचा करण्याचा प्रयत्न असल्याचं अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांनी म्हटलं आहे. या घटनेनंतर विनोद सोनावणे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
मुक्ताईनगर मतदारसंघात अपक्ष उमेदवारावर गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर मतदार संघात अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांच्या वाहनावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत ,तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. खंडणी मिळविण्याच्या उद्देशाने भीती घालण्यासाठी हा गोळीबार केला गेला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सामना
2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील रोहिणी खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी रोहिणी खडसे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. तर, चंद्रकांत पाटील अपक्ष निवडणूक लढवत होते. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक जिंकल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आता ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत आहेत.
इतर बातम्या :
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला