Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षाच्या याद्या आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर कोण कुठून लढणार हे निश्चित होत आहे. अशातच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपली यादी जाहीर करत आणखी 22 मतदारसंघातून आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. यात वर्ध्याचा आर्वी विधानसभेचा देखील समावेश असून शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, वर्ध्यात काँग्रेसच्या (Congress) हक्काच्या असलेल्या आर्वी विधानसभा क्षेत्रात अमर काळे यांच्या पत्नी तुतारी चिन्हावर विधानसभेच्या रिंगणात उतरल्या असल्याने मविआतील आर्वी विधानसभेचा तिढा अखेर सुटला आहे. मात्र यात काँग्रेसला तडजोड करावी लागले असल्याचे दिसून आले आहे.
आर्वी विधानसभेचा तिढा सुटला! मयुरा काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) वर्धा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला तो काँग्रेसच्या अमर काळे (Amar Kale) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढल्यामुळे. पण आता पुन्हा एकदा वर्ध्यात काँग्रेसच्या (Congress) हक्काच्या असलेल्या आर्वी विधानसभा क्षेत्रात खासदार अमर काळे यांनी त्यांच्या पत्नी मयुरा काळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवल्याच्या चर्चा होत्या. मात्र अखेर या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून खासदार अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे यांच्या नावावर अखेर आज शिक्कामोर्तब झाला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी
1. एरंडोल -सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर -सतीश चव्हाण
3. शहापूर -पांडुरंग बरोरा
4. परांडा- राहुल मोटे
5. बीड -संदीप क्षीरसागर
6. आर्वी -मयुरा काळे
7. बागलान -दीपिका चव्हाण
8. येवला -माणिकराव शिंदे
9. सिन्नर- उदय सांगळे
10. दिंडोरी -सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व- गणेश गीते
12. उल्हासनगर- ओमी कलानी
13. जुन्नर- सत्यशील शेरकर
14. पिंपरी सुलक्षणा- शीलवंत
15. खडकवासला -सचिन दोडके
16. पर्वती -अश्विनीताई कदम
17. अकोले- अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
19. माळशिरस- उत्तमराव जानकर
20. फलटण -दीपक चव्हाण
21. चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी- मदन कारंडे
मविआत घराणेशाहीला काँग्रेसकडून विरोध, मात्र...
असे असले तरी मधल्या काळात मविआत घराणेशाहीला काँग्रेसकडून विरोध दर्शवला होता. एकाच घरात दोन्ही उमेदवारी देण्याला काँग्रेसकडून विरोध होता. पती खासदार तर पत्नी आमदार, अशा घराणेशाहीच्या राजकारणाला काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी विरोध केला. आर्वी विधानसभा क्षेत्रात सामान्य माणसाशी नाळ जुडवून असलेले अनेक नेते असताना येथील जागा ही काँग्रेसला सुटावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र आर्वी विधानसभा क्षेत्रात ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याने आता काँग्रेस नेते काय भूमिका घेतात हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा