मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर कोण कुठून लढणार हे निश्चित होत आहे. बहुतांश मतदारसंघातील लढती आता निश्चित झाल्या असून मुंबईतील दोन्ही ठाकरेंच्या लढती फिक्स झाल्या आहेत. शिवसेना युबीटीचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे वरळीतून मैदानात उतरले आहेत. आदित्य यांना शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर मनसेकडून संदीप देशपांडे यांचे आव्हान आहे. दुसरीकडे माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांदाच विधानसभा लढवत आहेत. येथून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचे आव्हान अमित ठाकरेंना आहे. तसेच, शिवसेना युबीटीचे महेश सावंत हेही मैदानात आहेत. मात्र, अमित ठाकरेंविरुद्ध महायुतीने उमेदवार देऊ नये, असा सूर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आवळला आहे. त्यावर, आता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भूमिका मांडली. त्यावेळी, सदा सरवणकर यांची बाजू घेत त्यांना तिकीट देणं चुकीचं नाही, असे स्पष्टपणे म्हटलं आहे.


माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर येथून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचे आव्हान अमित ठाकरेंना आहे. तसेच, शिवसेना युबीटीचे महेश सावंत हेही मैदानात आहेत. मात्र, अमित ठाकरेंविरुद्ध महायुतीने उमेदवार देऊ नये, असा सूर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आवळला आहे. त्यावर, आता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी भूमिका मांडली. त्यावेळी, सदा सरवणकर यांची बाजू घेत त्यांना तिकीट देणं चुकीचं नाही, असे स्पष्टपणे म्हटलं आहे. ऐकुणात माहीम विधानसभा मतदारसंघातील अमित ठाकरेंवरुन महायुतीच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचे पुढे आले आहे. 


आशिष शेलार यांनी पत्र दिल्यास नक्की विचार होईल


दरम्यान, यावर भाष्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे. राज ठाकरे आणि आमचे सर्वांचे चांगले संबध आहेत. राज ठाकरेंनी गेल्या लोकसभेच्या वेळी मोदींना समर्थन दिले होते. मात्र ही राजकिय लढाई आहे. व्यक्तिगत सांगायच झालं तर त्यांचे आमचे पारिवारिक संबध आहे. पुढे काय होईल हे सांगता येत नाही. पुढे जनता ठरवेल. मात्र आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंच्या समर्थनाबाबत पत्र दिल्यास विचार होईल. अशी स्पष्टोक्तीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली आहे.


अनिल गावंडे हे पक्षाच्या तिकिटासाठी आलेले नाही


दरम्यान, आज प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी बच्चू कडूंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रहार आणि बच्चू कडू यांना विदर्भात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अनिल गावंडे यांना माझा शुभेच्छा आहेत. अनिल गावंडे हे पक्षाच्या तिकिटासाठी आलेले नाही. त्यांच्या पक्षात आल्याने अनेक मतदारसंघात फायदा होईल. असेही ते म्हणाले. 


वसंत देशमुख यांच्यावर  कडक कारवाई करायला हवी- चंद्रशेखर बावनकुळे


संगमनेर येथे भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले.  यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जयश्री ताई माझा मुली सारख्या आहेत. बाळासाहेब याच्याशी आमचे चांगले संबध आहेत. दरम्यान वसंत देशमुख यांच्यावर  कडक कारवाई करायला हवी, त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. मात्र सुजय विखे यांनी याचे  समर्थन केले नसताना त्यांच्यावर हल्ला केला. जाळपोळ केली जात आहे, हे योग्य नाही. असेही ते म्हणाले. 


हे ही वाचा