मुंबई : आगामी निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. कारण, नगरसेवकांपाठोपाठ आता मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. जुन्नरचे आमदार शरद सोनावणे आज मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला जुन्नरचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी वाचवलं होतं. मात्र आता ती नौकाही बुडण्याच्या मार्गावर आहे. समर्थकांसह शरद सोनावणे मातोश्रीवर येणार असून ते आजच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, शिवसैनिकांचा आमदार शरद सोनावणे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध असल्याचं कळतं. बाहेरचा उमेदवार शिवसैनिक स्वीकारणार नाही, अशी भूमिका जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशाराही दिल्याची चर्चा आहे.
निवडणुकीपूर्वी मनसेला धक्का, एकमेव आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2019 02:35 PM (IST)
2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला जुन्नरचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी वाचवलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -