सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. pic.twitter.com/NySo7NWkfS
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) April 3, 2019 मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत समाविष्ट करण्यास लाल कंदील मिळाला होता. यानंतर लोकसभा निवडणुका न लढविण्याबाबत मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली होती. लोकसभेच्या रिंगणात उतरलं नाही, तरी सरकारला पाडण्यासाठी मनसे मदत करणार असल्याचंही मनसेने स्पष्ट केलं आहे. मात्र राज ठाकरे आणि शरद पवारांची सलगी पाहता राज हे राष्ट्रवादीच्या मंचावर येतील का? याची चर्चा रंगली आहे. 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा' असं लिहिलेले पोस्टर्स नुकतेच सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या दरम्यान मनसेने पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. आता लोकसभेसाठी राज ठाकरे आणि मनसेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.साताऱ्यात मनसे उदयनराजेंच्या पाठीशी, काय म्हणाले उदयनराजे...
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2019 11:29 PM (IST)
खुद्द उदयनराजेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती दिली आहे. सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला, असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील नातं सर्वश्रुत आहे. मात्र मनसेने या लोकसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा न देता निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेने अद्याप कुठल्याही पक्षाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही. मात्र मनसेने साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत खुद्द उदयनराजेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती दिली आहे. सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला, असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.