पिंपरी चिंचवड : अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. पार्थ पवारांच्या आजच्या मावळमधील एका कार्यक्रमात मनसेचे झेडें पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच या कार्यक्रमात फ्लेक्स नाट्यही पाहायला मिळालं आहे.


राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मनसेचे मनसेचे झेंडे पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे राष्ट्रवादीला साथ देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र राज ठाकरे किंवा राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं राज ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र निवडणुकीत भाजपविरोधी प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मनसेचे झेंडे दिसल्याने यामागे शरद पवार-राज ठाकरे भेटीची गणित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



याशिवाय मंचावर लावण्यात आलेलं फ्लेक्स कार्यक्रम सुरु होण्याच्या काही वेळा पूर्वी बदलण्यात आलं. नव्या फ्लेक्समध्ये बरेच बदल करण्यात आले. अजित पवार, शेकाप नेते जयंत पाटील यांचे फोटो जुन्या फ्लेक्समध्ये लहान होते, ते मोठे करण्यात आले. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो दिसून आले. स्थानिकांचे फोटो नसल्याने ते नाराज झाल्याची चर्चा होती. म्हणूनच ऐनवेळी फ्लेक्सवर नवीन फ्लेक्स चढवण्यात आला.


संबंधित बातम्या


'पार्थ पवार लंबी रेस का घोडा है... याद रखना', नितेश राणेंकडून पाठराखण


धुळ्यात भाजपच्या सुभाष भामरेंचा पराभव करणे हे एकच लक्ष्य : अनिल गोटे