मुंबई : मागच्या दाराआडून अर्थात विधानपरिषदेच्या माध्यमातून मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचणाऱ्यांची धाकधूक वाढणार आहे. कारण सेदत मागच्या दारातून, म्हणजेच राज्यसभेतून मंत्री झालेल्या खासदारांना निवडणूक लढवण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. तोच पॅटर्न आता महाराष्ट्रातही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महाराष्ट्रात मागच्या दारानं आलेल्या नेत्यांना आता विधानसभेच्या आखाड्यात उतराव लागणार आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, रणजित पाटलांसारख्या, विधानपरिषदेतल्या आमदारांचाही समावेश आहे. यापुढे मंत्री बनायचं असेल तर विधानसभेची निवडणूक जिंकावी लागेल, असा निरोप विधानपरिषदेच्या दारातून मंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेल्या आमदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी देखील राज्यसभेमार्फत मंत्री झालेल्या खासादारांना हा संदेश दिला होता. आणि आता विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात देखील मोदींच्या नव्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी होणार आहे.
दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होणार?
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत भाजपच्या तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह (देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर) भाजपची सुकाणू समिती उपस्थित आहे.
केंद्रीय निवडणूक समितीची ही बैठक पार पडल्यानंतर एक - दोन दिवसात उमेदवारांची यादी जाहीर केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपची पहिली यादी कधी येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, राज्यात भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली नाही, त्यामुळे आधी युतीची घोषणा करुन मग उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता अधिक आहे.
आजच्या बैठकीत तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब झाले, तर उद्या (30 सप्टेंबर)किंवा 1 ऑक्टोबर रोजी युतीची घोषणा होईल. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्षदेखील याचदरम्यान उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेतून मंत्रिपदं मिळवणाऱ्यांची धाकधूक वाढणार, विधानसभेच्या निवडणुका लढवण्याबाबत सूचना?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2019 06:13 PM (IST)
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी देखील राज्यसभेमार्फत मंत्री झालेल्या खासादारांना हा संदेश दिला होता. आणि आता विधानसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात देखील मोदींच्या नव्या फॉर्म्युल्याची अंमलबजावणी होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -