Radhanagari Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघात प्रचार अवघा शिगेला पोहोचला आहे. प्रचार सर्वच ठिकाणी शांततेत सुरू असला, तरी राधानगरीमध्ये प्रचाराला गालबोट लागलं आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आंबिटकर यांची पोस्टर्स फाडण्यात आल्याने ऐन निवडणूक भरात आली असतानाच वादाची ठिणगी पडली आहे. मुदाळ तिट्टा आणि आणि कावणे गावाजवळ लावण्यात आलेली पोस्टर्स फाडण्यात आल्याने आमदार प्रकाश आंबिटकर आक्रमक झाले आहेत. आबिटकर यांनी पोस्टर फाडाल मात्र जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही असं म्हणत जोरदार पलटवार केला आहे.
मात्र जनतेच्या मनामध्ये असलेलं स्थान फाडू शकणार नाही
पोस्टर फाडाफाडीनंतर आबिटकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की विरोधकांच्या हाती माणसे लागत नसल्याने हा रडीचा डाव सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन काम केली असती, तर ही पोस्टर फाडण्याची वेळ आली नसती अशा शब्दात प्रकाश आबिटकर यांनी विरोधकांवर घणाघाती हल्लाबोल केला. तुम्ही माझं पोस्टर फाडू शकाल, मात्र जनतेच्या मनामध्ये असलेलं स्थान तुम्ही फाडू शकणार नाही. जनता याचं मतपेटीमधून उत्तर देईल असा इशारा सुद्धा प्रकाश आबिटकर यांनी दिला.
राधानगरी विधानसभेसाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत
दरम्यान राधानगरी विधानसभेसाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. त्यामुळे तुंबळ युद्धामध्ये कोण बाजी मारणार याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार के. पी. पाटील रिंगणात आहेत. के पी पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आदमापूरमध्ये सभा घेतली होती. त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए वाय पाटील यांनी सुद्धा केलेली बंडखोरी आंबिटकर यांची डोकेदुखी वाढवणार की पाहुणे केपी पाटील यांच्यासाठीच डोकेदुखी ठरणार हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बंडखोरीची चर्चा चंदगड आणि राधानगरी दोन मतदारसंघांमध्ये रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या