मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार ते निवडणूक आयोगाने तपासावेत अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभांमध्ये व्हिडीओ दाखवत भाजपच्या अनेक दाव्यांची पोलखोल केली आहे. त्यामुळे भाजप देखील व्हिडीओ दाखवून 27 एप्रिल रोजी उत्तर देणार आहे.
27 एप्रिलला मुंबईतील प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवेल त्यावर कोणताही पक्ष किंवा नेता उत्तर देऊ शकणार नाही. भाजप जे आरोप करेल ते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून येईल जे मतदारांना प्रभावित करेल. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवणार ते आधी तपासून घेण्यात यावी, असे देवरा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्रचाराची मुदत संपल्यावर याबाबत काही छापून येणार असेल किंवा दाखवण्यात येणार असेल तर ते नियमित असावे अशी मागणी मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
आता 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी-शाहांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपदेखील व्हिडीओचाच आधार घेणार आहे. 27 तारखेला होणाऱ्या भाजपच्या सभेत मनसेला मनसेच्याच स्टाईलनं उत्तर मिळणार असल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं आहे. त्यामुळं मनसे आणि राज ठाकरेंची पोलखोल करणारा कोणता व्हिडीओ भाजपच्या हाती लागलाय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राज ठाकरेंच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार आहे ते निवडणूक आयोगाने तपासावेत, मिलिंद देवरा यांची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Apr 2019 09:43 AM (IST)
प्रचाराची मुदत संपल्यावर याबाबत काही छापून येणार असेल किंवा दाखवण्यात येणार असेल तर ते नियमित असावे अशी मागणी मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -