Parbhani loksabha Election 2024 Panjabrao Dakh :  राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचे निकाल (loksabha Election Result 2024) हाती आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे. जवळपास 30 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीत परभणी लोकसभा (Parbhani loksabha) मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली आहे. या मतदारसंघातून हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी झाले आहेत. 


पंजाबराव डखांना 95 हजार 967 मते मिळाली


परभणी लोकसभा मतदारसंघात संजय जाधव यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. त्यांनी महादेव जानकर आणि पंजाबराव डख यांचा पराभव केला आहे. जवळपसा 1 लाख 34 हजार मतांनी ते निवडूण आले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत हवामानाचा अचूक अंदाज सांगणाऱ्या पंजाबराव डखांना नेमकी किती मते मिळाली? हवामानाचा अचूक अंदाज त्यांनी सांगितला मात्र, त्यांना राजकारणाा अंदाज आला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या निवडणुकीत पंजाबराव डखांना 95 हजार 967 मते मिळाली. म्हणजे या निवडणुकीत त्यांचा 5 लाख 53 हजार मतांनी पराभव झाला आहे. 


वसंत मोरेंपेक्षा पंजाबराव डखांना जास्त मते 


वंचित बहुजन आघाडीने राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवार उभा केले होते. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंजाबराव डख यांची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, वसंत मोरेंचाही अंदाज चुकला आणि पंजाबराव डखांचांही अंदाज चुकला आहे. मात्र, वंचितच्या पंजाबराव डख यांना वसंत मोरे यांना जास्त मते मिळाली आहेत. पंजाबराव डख जरी पराभूत झाले असले तरी, त्यानी वसंत मोरेंपेक्षा जास्त मते घेतली आहेत. 


परभणी लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे, हा मतदारसंघ परभणी व जालना ह्या दोन्ही जिल्ह्यांचा आहे. या शिवाय जिंतूर, परभणी, पाथरी आणि गंगाखेड या 4 विधानसभा मतदारसंघाचा समावेश परभणी मतदारसंघात आहे. या 6 मतदारसंघांपैकी जिंतूर व परतूर या 2 मतदारसंघात भाजपचे, गंगाखेड मतदारसंघात रासपचे, घनसांगवीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, पाथरीत काँग्रेसचे आमदार आहेत, तर परभणी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. म्हणजेच, भाजप वगळता इतर 4 पक्षाचे एक-एक आमदार आहेत. तर महायुतीचे 4 आमदार असल्याचे दिसते.


महत्वाच्या बातम्या:


मराठा आरक्षणाचं केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीत महादेव जानकरांना लीड, कोणाला किती मते?